Photo – आळंदीत आषाढी यात्रेनिमित्त इंद्रायणीची आरती ; नदी घाटाची स्वच्छता

Photo – आळंदीत आषाढी यात्रेनिमित्त इंद्रायणीची आरती ; नदी घाटाची स्वच्छता

तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर महिलांनी घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ उपाय योजना कराव्यात असे आवाहन माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे यांनी केले आहे. तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने अनिता झुजम, अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचे आयोजन केले.

आषाढी वारी निमित्त बुधवारी एकादशी दिनी इंद्रायणीची आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिरूर लोकसभा उपसंघटक, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, माजी नगरसेविका उषा नरके, स्वाती पजई, मोनिका बिडवे, राणी वाघ, वंदना लोखंडे, सन्याली ठाकूर, कल्याणी माळवे, शोभा कुलकर्णी, उषा नेटके, नमीता चौधरी, उषा ननवरे, अनिता शिंदे, लता शेवते, जिजाबाई भामरे, मीरा कांबळे, शालन होनावळे, नीलम कुरधोंडकर, ईश्वरी शिर्के, सविता कांबळे, विद्या आढाव, लता वर्तुळे, ताई सरोदे, माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, गोविंद ठाकूर तौर, पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन मराठवाडा विभाग प्रमुख रवींद्र जाधव, वैभव दहिफळे, सुरेश दौण्डकर आदींसह मोठ्या संख्येने महिला आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;