पंढरपुरात लोकअदालतीमध्ये 164 प्रकरणे निकाली; 6 कोटी 19 लाखांचे तडजोड शुल्क वसूल

पंढरपुरात लोकअदालतीमध्ये 164 प्रकरणे निकाली; 6 कोटी 19 लाखांचे तडजोड शुल्क वसूल

तालुका विधी सेवा समितीच्या वतीने जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 164 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणांमध्ये एकूण सहा कोटी 18 लाख 80 हजार 654 रुपयांची तडजोड झाल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे प्रभारी अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. देसाई यांनी दिली.

या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित 19 हजार 989 प्रकरणांपैकी 138 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये पाच कोटी 70 लाख 98 हजारांची वसुली झाली. तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण तीन हजार 980 प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. त्यांपैकी 26 प्रकरणांमध्ये 47 लाख 82 हजारांची वसुली करण्यात आली.

या लोकअदालतीसाठी एकूण पाच पॅनेल्सची व एका नियमित न्यायालयाची व्यवस्था करण्यात आली होती. या पॅनेलमध्ये जिल्हा न्यायाधीश एस. बी. देसाई, न्यायाधीश ए. ए. खंडाळे, न्यायाधीश एस. एस. चोपडा, न्यायाधीश के. जे. खोमणे, न्यायाधीश पी. बी. घोरपडे, नियमित न्यायालयासाठी न्यायाधीश ए. एस. सोनवकर यांनी काम पाहिले.

या लोकअदालतीमध्ये न्यायाधीश एस. एस. चोपडा यांनी तब्बल 32 वर्षे जुन्या दिवाणी प्रकरणात यशस्वीरीत्या तडजोड घडवून प्रकरण निकाली काढले. ही लोकअदालत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डी. एन. सुरवसे, न्यायाधीश एस. एस पाखले यांनी वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;