पूजा खेडकरला कारणे दाखवा नोटीस

पूजा खेडकरला कारणे दाखवा नोटीस

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्र शासनाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाकडून (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. खेडकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत त्यांनी येत्या 2 ऑगस्टपर्यंत लेखी खुलासा करावा, असे आदेश त्यांना दिले आहेत.

प्रशिक्षणार्थी कालावधी असताना पूजा खेडकरने खासगी आलिशान मोटारीला अंबर दिवा लावला. मोटारीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली. त्यांनी बैठकीसाठी स्वतंत्र दालन घेतले, तसेच शिपाईही घेतले. प्रशिक्षणार्थी खेडेकर यांच्या बडेजावपणाचे प्रकार उघडकीस आले. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयीन अधिकाऱयांनी तक्रार केली. खेडकर प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकारी दिवसे यांनी राज्य सरकारकडे पाठविला. खेडकर यांच्यावर असलेल्या आरोपाबाबत लेखी खुलासा करण्यात यावा, असे आदेश केंद्र शासनाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अॅण्ड ट्रेनिंग) दिले आहेत. याबाबत खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;