कोयना नदीवरील चारही योजना इंटरलिंक करण्याची आवश्यकता

कोयना नदीवरील चारही योजना इंटरलिंक करण्याची आवश्यकता

कराड शहराला होत असलेला पाणीपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी कोयना नदीवरील कराड, मलकापूर, वारुंजी व उंडाळे या योजनांचे इंटरलिंकिंग करणे गरजेचे आहे, असे मत माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.

आमदार चव्हाण यांनी पुन्हा एकदा कराडच्या पाणीप्रश्नाबाबत पालिकेच्या व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला. तसेच मीटिंगनंतर जलशुद्धीकरण केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्याधिकारी, एमजीपीचे अधिकारी उपस्थित होते.

आमदार चव्हाण म्हणाले, ‘महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी कराड नगरपालिकेसोबत समन्वयच ठेवला नसल्याने पाणीप्रश्न उद्भवला. जुन्या जॅकवेलची यंत्रणा चालू केल्यानंतर शहराला 40 टक्के पाणीपुरवठा सुरू झाला आहे. वारुंजी येथील जॅकवेल पुन्हा चालू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. पण, तो निर्णय होईपर्यंत पूर्ण क्षमतेने कराड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पुलावरून पाइपलाइन आणली जाईल. हे काम जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पूर्ण होणार आहे. येत्या 10 ते 15 दिवसांत शहराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांचे सहकार्य मिळतच आहे.’ कराड शहराची लोकसंख्या वाढत असून, त्यामुळे शहराला 100 टक्के पर्यायी व्यवस्था असणारी पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे चव्हाण म्हणाले. तसेच वारुंजी येथील बंधाऱ्याची उंची वाढविण्याची गरज असल्याची मागणी विधानसभेत केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र मीटिंग लावण्याचे आश्वासन दिले होते. ती योजना जर कार्यान्वित झाली, तर कराड शहराला शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

कोयना धरणातून थेट पाईपलाईन योजना

कराड पालिकेच्या व एमजीपीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कराड शहरासाठी कोयना धरणातून थेट पाइपलाइन योजना उपक्रम केला, तर फक्त कराड शहरालाच नव्हे, तर कोयना नदीकाठच्या सर्व गावांना स्वच्छ पाणीपुरवठा करता येईल. त्यासोबतच गुरुत्वाकर्षणामुळे कमी खर्चात हा प्रकल्प राबविता येऊ शकेल. मी मुख्यमंत्री असताना कोल्हापूरला अशीच योजना मंजूर केली होती, ती आता पूर्ण झाली आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;