नगरमधील अवैध धंदे बंद झाल्याशिवाय माघार नाही; भ्रष्टाचारी पोलिसांविरोधात खासदार लंके यांचे उपोषण सुरू

नगरमधील अवैध धंदे बंद झाल्याशिवाय माघार नाही; भ्रष्टाचारी पोलिसांविरोधात खासदार लंके यांचे उपोषण सुरू

जिल्हा पोलीस प्रशासनातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खासदार नीलेश लंके यांनी आजपासून पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे उपोषण सुरू केले आहे. उपोषणादरम्यान सामान्य नागरिकांनी पोलिसांविरोधात केलेल्या तक्रारींचा अक्षरशः धो-धो पाऊस पडला. दरम्यान, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची बदली तसेच अवैध व्यवसाय बंद झाल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका खासदार लंके यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. दरम्यान, उपोषणापूर्वी आंदोलकांनी पोलिसांच्या कारभाराचा निषेध करत प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला.

खासदार लंके म्हणाले, आज लेखी स्वरूपात मोठय़ा प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नगर जिह्यात मोठय़ा प्रमाणात अवैध धंदे वाढलेले आहेत. हप्तेखोरी चालू आहे. गुटख्याच्या गाडय़ा सर्रास सोडल्या जातात. श्रीगोंदे तालुक्यात भोसले नामक पोलीस अधिकाऱयाने मुस्लिम समाजाच्या घरात जाऊन गायीचा गोठा बंद करून त्यांची उपजीविका बंद केली. पोलिसांची धटिंगशाही सुरू आहे. तक्रारी घेतल्या जात नाहीत. पोलीस अधिकारी, कर्मचारी पैसे गोळा करण्यात मश्गूल आहेत. लोकसभेवेळी माझ्या फोन नंबरचे कॉल रेकॉर्डिंग काढल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची तत्काळ बदली करावी, त्यांच्याकडील अतिरिक्त कारभार काढून घेण्यात यावा, या मागणीसह जोपर्यंत अवैध व्यवसाय बंद करण्यासंदर्भात ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा खासदार लंके यांनी दिला.

यावेळी अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, किरण काळे, दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, प्रकाश पोटे, बाबाजी तरटे, सुदाम पवार, सुवर्णा धाडगे, ऍड. राहुल झावरे, बाळासाहेब खिलारी, अभयसिंह नांगरे, चंद्रभान ठुबे, प्रा. संजय लाकूडझोडे, ज्ञानदेव लंके उपस्थित होते.

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होऊ शकतो

ह हे आंदोलन दडपण्यासाठी साध्या वेशातील पोलीस आंदोलनात सहभागी होऊन वाईट कृत्य केले जाऊ शकते. पोलीस बळाचा वापर करू शकतात. त्यातून खोटे गुन्हे दाखल करण्याचाही प्रयत्न होईल. त्यामुळे संपूर्ण आंदोलनादरम्यान माध्यम प्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचे आवाहन खासदार लंके यांनी केले.

सुवर्णकारांकडून एका गुह्यातील मुद्देमाल दहावेळा वसूल केला जातो. सुवर्णकारांना अनधिकृत लॉकअपमध्ये बसवून दहशत निर्माण केली जाते. अशा पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांवर मोक्कांतर्गत कारवाई झाली पाहिजे. अनिल राठोड यांच्यानंतर खासदार लंके यांनी सुवर्णकार बांधवांवर होणाऱया अन्यायाविरोधात आवाज उठविला आहे.

– श्री. लाळगे, अध्यक्ष, सुवर्णकार संघटना

चोरीचे सोने घेतल्याचा खोटा आरोप करून माझ्या पतीला मारहाण करीत पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले. तेथील उपनिरीक्षकाने सेटलमेंट करून घेण्याचा सल्ला दिला. त्यास नकार दिल्याने पतीला मारहाण केली. अडीच लाखांचे सोने आणून दिल्याशिवाय पतीची सुटका केली नाही.

– प्रियंका गायकवाड, तक्रारदार

तपास थांबविण्यासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणारे कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेत आहेत. गुन्हे शाखेच्या कर्मचाऱयांनी कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्यानंतर संबंधित स्टेशन डायरीला नोंद करणे बंधनकारक असते. मात्र, तसे न करता खुलेआम हप्तेवसुली करण्यात येते.

– ऍड. हरिहर गर्जे, पाथर्डी

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;