Nagar: आधी शहरातील रस्ते दुरुस्त करा मग पार्किंगसाठी पैसे घ्या! शिवसेना आक्रमक

Nagar: आधी शहरातील रस्ते दुरुस्त करा मग पार्किंगसाठी पैसे घ्या! शिवसेना आक्रमक

नगर महानगरपालिका नगर शहरात 36 रस्ते आणि जागांवर पे अँड पार्क सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावना नगर शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विरोध दर्शवला आहे. अगोदर नगर शहरातले रस्ते व्यवस्थित दुरुस्त करा ते मोठे आणि प्रशस्त करा आणि मग पें अँड पार्क लागू करा, असे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.

ठराव राज्य सरकारकडे रद्द करण्यासाठी पाठवावे व फेरनिविदा करण्यात यावी, अशी मागणी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केली आहे.

पार्किंगची समस्या नगर शहरात खूपच बिकट आहे. चितळे रोड, कापड बाजार, माळीवाडा या रस्त्यावर चार चाकी वाहन लावण्यास जागा नाही. दुचाकी गाड्या बेशिस्तपणे रस्त्यावर पार्क केलेले असतात. ही समस्या सोडवण्यासाठी पार्किंग साठी शुल्क आकारणे हा उपाय होऊ शकत नाही.

मनपा पार्किंग शुल्क आकारणीचा ठेका खाजगी ठेकेदाराला देत आहे. याद्वारे मनपाला पाच वर्षात 21 लाख रुपये मिळणार आहे असा दावा कागदो पत्री केला जातो आहे. नगर शहर आणि सावेडी भागातील विविध रस्त्यांवर काही ठिकाणी नो होकर्स झोन लागू करून त्या ठिकाणी शुल्क घेऊन पार्किंग सुरू करणार आहे.

एका तासाला टू व्हीलर ला पाच रुपये आणि फोर व्हीलर ला दहा रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. नगर शहरांमध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे स्थानिक गुंड पार्किंग सेवा देऊन शुल्क घेतात. आता अधिकृतपणे ठेका देऊन वाहन चालकांकडून करण्यात येणारी शुल्क आकारणी हा मनपा ने लादलेला जिझिया कर आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे.

मनपाने शुल्का आकारणी करू नये, ठराव विखंडित करावे अन्यथा शिवसेना या ठेकेदाराला पार्किंग शुल्क आकारणी करू देणार नाही असा इशारा देण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;