पूजा खेडकरच्या आईची ‘गुंडागिरी’; शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हरने दमदाटी करताना व्हिडीओ व्हायरल

पूजा खेडकरच्या आईची ‘गुंडागिरी’; शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हरने दमदाटी करताना व्हिडीओ व्हायरल

पदाची हवा डोक्यात गेल्यामुळे सध्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे नाव देशभरात गाजत आहे. वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकर यांचे रोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत. त्यानंतर आता त्यांच्या आई मनोरमा खेडकर यादेखील वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांचा शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हर रोखून दमबाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पुणे जिह्यात प्रोबशनरी आयएएस म्हणून आलेल्या आणि गैरवर्तनामुळे वाशीमला रवानगी करण्यात आलेल्या पूजा खेडकर सध्या चर्चेत आहेत. पुण्यापासून त्यांच्या कारनाम्यांची चर्चा असून आता थेट दिल्लीमध्येदेखील चौकशी सुरू होणार आहे. त्यांच्याबाबत रोज धक्कादायक बाब समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या आई मनोरमा यांची गुंडागिरी करताना रिव्हॉल्व्हर रोखलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पूजा खेडकर यांच्या आईचा पोलिसांवर आरेरावी करणारा व्हिडीओ समोर आला होता. चौकशीसाठी घरी आलेल्या पोलिसांवर त्या आरोप करत असल्याचे व धमकावत असल्याचे दिसून आले आहे.

धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती. मात्र ती जमीन ताब्यात घेताना त्यांनी शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केल्यामुळे गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आणि त्यातून हा वाद उद्भवला, असं सांगितलं जात आहे. मला कायदा सांगू नका, मला सातबाऱ्यावर माझं नाव आहे, असे त्या शेतकऱ्यांना दरडावून सांगताना दिसत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;