तुळजाभवानीला चॉकलेटचा हार घातला! पुजारी मंडळाकडून निषेध

तुळजाभवानीला चॉकलेटचा हार घातला! पुजारी मंडळाकडून निषेध

महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानीला फुलांचा, सोने -चांदी, हिऱयांचा हार अर्पण करण्यात आल्याचे आतापर्यंत ऐकिवात होते, मात्र शनिवारी भाविकांनी अर्पण केलेला चॉकलेटचा भलामोठ्ठा हार तुळजाभवानीला घालण्यात आला. यामुळे नव्याच वादाला तोंड फुटले असून मंदिरातील पुजारी मंडळाने याचा कडक शब्दांत निषेध केला आहे.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. कुणी बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी देवीला श्रद्धापूर्वक दागदागिने, वस्त्र्ा अर्पण करतात. भाविकांनी देवीला अर्पण केलेल्या वस्तू परिधान करून देवीचा शृंगारही करण्यात येतो. आज मात्र वेगळीच घटना घडली. एका भाविकाने तुळजाभवानीला चॉकलेटचा भलामोठा हार आणला. भाविकाने अर्पण केलेला हा हार देवीला घालण्यात आला. चॉकलेटच्या या हारावरून मंदिर परिसरात कुजबूज सुरू झाली. त्यावर मंदिर संस्थानच्या परवानगीने हा हार घालण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पुजारी मंडळाने देवीला चॉकलेटचा हार घालण्यास आक्षेप घेतला. देवीचा गाभारा ऐतिहासिक आहे. इथल्या परंपराही सर्वांना माहिती आहेत. त्यामुळे नवनवीन प्रथा कशासाठी सुरू करण्यात येत आहेत, असा सवाल पुजारी मंडळाकडून उपस्थित करण्यात आला. मंदिराची स्वतःची नियमावली असताना असे चुकीचे प्रकार घडत असून त्याकडे स्वतः जिल्हाधिकाऱयांनी लक्ष द्यावे, अशी मागणीही पुजारी मंडळाने केली.

देवीला फुलांचा, सोने-चांदीचा, हिऱयाचा हार अर्पण केल्याचे आम्ही पाहतो, परंतु चॉकलेटचा हार घातल्याचे पहिल्यांदाच पाहण्यात आले. तुळजाभवानी मंदिराची एक परंपरा आहे. मंदिराचे पावित्र्य आणि परंपरा जपल्या पाहिजेत, अशी प्रतिक्रिया पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे यांनी व्यक्त केली.

तुळजाभवानीला चॉकलेटचा हार अर्पण केल्याचे माझ्या कानावर आले. यासंदर्भात मंदिरातील अधिकारी, पुजारी यांच्याकडून माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.

n डॉ. सचिन ओंबासे,

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;