सांगली जिल्हा बँक अपहार प्रकरण, नऊ कर्मचाऱ्यांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा

सांगली जिल्हा बँक अपहार प्रकरण, नऊ कर्मचाऱ्यांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव तालुक्यातील तासगाव, मार्केट यार्ड तासगाव, हातनूर, सिद्धेवाडी आणि निमणी या पाच शाखांत तब्बल एक कोटी 62 लाख 67 हजार 835 रुपयांचा अपहार झाल्याबाबत जिल्हा बँकेच्या वतीने नऊ कर्मचाऱ्यांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सांगली जिल्हा बँकेच्या निमणी शाखेत व्याज आणि शासकीय अनुदान खात्यातील 8 लाख 32 हजार 900 रुपये शाखेतील कर्मचारी प्रमोद सुरेश कुंभार (रा. सांगलीवाडी) आणि शाखाधिकारी विजय तुकाराम यादव (रा. पलूस) या दोघांनी संगनमताने अपहार केला आहे. प्रमोद कुंभार याने वैयक्तिक 8 लाख 12 हजार 400 रुपयांचा आणि शाखाधिकारी यादव यांच्या संगनमताने 20 हजार 500 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी हबीब जहिरुद्दीन कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे.

सिद्धेवाडी शाखेत अविनाश दिलीप पाटील (रा. अंजनी), विनायक शंकर सूर्यवंशी (रा. नागेवाडी), सुरेश वसंतराव कोळी (रा. मांजर्डे) या तीन कर्मचाऱ्यांनी 40 लाख 86 हजार 568 रुपयांची रक्कम शाखेतील सहा खातेधारकांच्या खात्यावर परस्पर संमतीविना वर्ग करून अपहार केला आहे. याप्रकरणी विक्रांत विजयकुमार लाड यांनी फिर्याद दाखल केली आहे.

बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखा आणि हातनूर शाखेतून कर्मचारी संजय कुमार पाटील (रा. शिरगाव) याने शासकीय अनुदानाची रक्कम सहा खातेदारांच्या वैयक्तिक खात्यावर परस्पर वर्ग करून 64 लाख 58 हजार 68 रुपयांचा अपहार केला आहे. याप्रकरणी विक्रांत विजयकुमार लाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. तासगाव शाखेत प्रमोद सुरेश कुंभार (रा. सांगलीवाडी), योगेश सुरेश वजरीणकर (रा. तासगाव), मारुती यशवंत हिले (रा. नांद्रे) या कर्मचाऱ्यांनी संगनमताने अवकाळी अनुदान, दुष्काळी निधी, संजय गांधी निराधार पेन्शन खाते असे टप्प्याटप्प्याने एकूण 48 लाख 90 हजार 299 रुपयांचा अपहार केला आहे. याप्रकरणी हबीब कुलकर्णी यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

नेलकरंजी शाखेतील तीन कर्मचाऱ्यांवरही गुन्हा

आटपाडी तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नेलकरंजी शाखेत 48 लाख 88 हजार 378 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी रोखपालासह तीन कर्मचाऱ्यांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छिंद्र गुंडा म्हारगुडे (रा. तळेवाडी), प्रदीप गुलाब पवार (करगणी) आणि दिगंबर पोपट शिंदे (नेलकरंजी) अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तालुका विभागीय अधिकारी व वसुली अधिकारी हारुण रज्जाक जमादार यांनी फिर्याद दिली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;