कोल्हापुरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

कोल्हापुरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

पूर्ववैमनस्य व टोळीयुद्धातून खुनाच्या घटनेपाठोपाठ सोशल मीडियावरील रिल्समधून खुन्नस देऊन खून करण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच पुन्हा एकदा पूर्ववैमनस्यातून भरदिवसा दगडाने ठेचून तरुणाचा खून केल्याच्या घटनेने कोल्हापूर हादरले आहे.

गजबजलेल्या राजारामपुरी परिसरात दिवसाढवळ्या तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना समोर आली आहे. पंकज निवास भोसले (वय 30, रा. कनाननगर, जिल्हाधिकारी कार्यालयामागे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. यातील दोघा हल्लेखोरांना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य दोघांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. राजारामपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात येत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात अनेक ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पंकज भोसले याचा गणेश विक्रम काटे आणि नीलेश विक्रम काटे या दोन्ही भावांशी पूर्ववैमनस्यातून वाद झाला होता. या वादातूनच राजारामपुरी 13 वी गल्लीतील एका गॅस एजन्सीजवळ काटे बंधू, अमित गायकवाड आणि त्याचा साथीदार अशा चौघांनी पंकज भोसले याला गाठून त्याच्याशी वाद घातला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी दगडाने ठेचून या चौघांनी पंकजचा खून केला.

शहरात आणखी एक खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. भोसले याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, राजारामपुरी ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;