महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढला; विजेचा शॉक लागून म्हैस ठार
महाबळेश्वर आणि परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. आज दिवसभर येथे पावसाची संततधार सुरू होती. या पावसामुळे अवकाळी येथील सुनील सीताराम भिलारे यांची म्हैस पारशीमळा शिवारात दुपारी विजेचा शॉक लागून जागीच ठार झाली. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी अवकाळी येथील पारशीमळा शिवारात विद्युत खांबावरील दोन तारा तुटल्या होत्या. यासंदर्भात ग्रामस्थांनी वीज वितरण विभागाला माहिती दिली. वीज वितरण विभागाने तुटलेल्या दोन तारांपैकी एक तार काढून टाकली आहे. त्याच खांबावर एक तार तुटलेल्या अवस्थेत लटकत होती. या तुटलेल्या तारेतून वीजप्रवाह सुरू होता. आज सुनील भिलारे यांच्या आई म्हैस घेऊन पारशीमळा शिवारात गेल्या होत्या. त्यावेळी तुटलेल्या तारेच्या धक्क्याने म्हैस जागीच ठार झाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List