प्रामाणिकपणा बस कंडक्टरने प्रवासी महिलेचा महागडा मोबाईल परत केला

प्रामाणिकपणा बस कंडक्टरने प्रवासी महिलेचा महागडा मोबाईल परत केला

आपल्याजवळील हरवलेल्या वस्तुची प्रत्येकालाच चुटपूट लागत असते. प्रामाणिक अप्रामाणिकपणावर नेहमीच चर्चा होते पण कोपरगांव आगारातील वाहक ए. पी. माळी हे त्याला अपवाद आहेत, प्रवासात बसमध्ये विसरलेला महागडा मोबाईल त्यांनी प्रवाशाला परत करत कर्तव्यात चोख असल्याचे दर्शन दिले आहे.

याबाबतची माहिती अशी की, कोपरगांव आगारातील वाहक ए. पी. माळी आणि वाहक श्री. शेख हे बुधवारी बस मुक्कामी सत्यगांवी घेवुन गेले. गुरूवारी (27 जून) ही बस परत कोपरगांवी आगारात आली. सत्यगांवहुन कोपरगांवी आलेले बस मधील सर्व प्रवासी उतरलेही त्या गडबडीत एका महिला प्रवाशाचा महागडा मोबाईल बसमध्ये विसरला. गोधेगांवच्या दिशेने बसचा प्रवास सुरू झाला. कोपरगांवी उतरलेल्या महिलेला तिच्या मोबाईलची आठवण झाली तीने आगारात चौकशी करता वाहक ए. पी. माळी यांच्या मोबाईलवर कॉल केला. बस तोपर्यंत साईबाबा कॉर्नरपर्यंत आली होती. सदर महिला एका मोटारसायकलस्वाराच्या सहायाने साईबाबा कॉर्नरपर्यंत आली वाहक ए. पी. माळी यांनी त्या महिलेला तिचा महागडा मोबाईल परत केला त्यावर त्या महिलेने वाहकाचे आभार मानले आणि ती निघुन गेली. वाहक ए. पी. माळी यांच्या तोडुन कष्टाचे पुरत नाही तर असे फुकटचे घेवुन काय करायचे असे शब्द निघाले त्यांच्या या प्रामाणिकपणाचा सर्वत्र लौकिक होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;