पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण बिल्डरपुत्राच्या सुटकेचे आदेश; पोलिसांना हायकोर्टाचा झटका

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण बिल्डरपुत्राच्या सुटकेचे आदेश; पोलिसांना हायकोर्टाचा झटका

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात बिल्डरपुत्राला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱया पोलिसांना मंगळवारी उच्च न्यायालयाने दणका दिला. बेदरकार ड्रायव्हिंग करून दोघांचा जीव घेणाऱया अल्पवयीन मुलाला निरीक्षणगृहातून सोडण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. तसेच मुलावर मानसोपचारतज्ञांद्वारे उपचार सुरू ठेवण्याचे निर्देश दिले.

19 मेच्या मध्यरात्री बिल्डरपुत्राने बेदरकार ड्रायव्हिंग केली आणि दोघांचा बळी घेतला. या घटनेनंतर बिल्डरपुत्राला वाचवण्याचा प्रयत्न झाला. त्यावर नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळल्यानंतर आरोपी अल्पवयीन मुलाची कोठडीत रवानगी केली होती. तथापि, मुलाला नियमबाह्य पद्धतीने निरीक्षणगृहाच्या कोठडीत ठेवले. पोलिसांची कारवाई बेकायदा आहे, असा दावा करीत मुलाच्या आत्याने उच्च न्यायालयात हेबिअस कॉर्पस याचिका दाखल केली. याचिकेवर दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती भारती डांगरे व न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने शुक्रवारी निर्णय राखून ठेवला होता. हा निर्णय मंगळवारी जाहीर करताना खंडपीठाने आरोपी मुलाला दिलासा, तर पुणे पोलिसांना झटका दिला. मुलाला कोठडीत पाठवण्याचा आदेश बेकायदा असून त्याची निरीक्षणगृहातून सुटका करावी आणि आत्याच्या ताब्यात द्यावे, असे निर्देश खंडपीठाने दिले.

न्यायालय म्हणाले
आम्ही कायद्याने बांधील आहोत. अल्पवयीन मुलाला कोठडीत ठेवणे बेकायदेशीर आहे.
गुह्याचे स्वरूप गंभीर आहे. तथापि, बाल न्याय कायद्याची उद्दिष्टे विचारात घेता अल्पवयीन मुलाला प्रौढांपेक्षा वेगळी वागणूक दिली पाहिजे.
आरोपी अल्पवयीन मुलाला निरीक्षणगृहात पाठवताना मानसोपचारतज्ञांद्वारे उपचार घेण्याची शिफारस केली होती. त्यानुसार त्याच्यावर यापुढेही मानसोपचारतज्ञांद्वारे उपचार सुरू ठेवावेत. 

न्यायालयात पोलीस तोंडघशी
पुणे पोलिसांतर्फे सरकारी पक्षाने आरोपी मुलाच्या सुटकेला विरोध केला होता, मात्र पुराव्यांत हेराफेरी करण्याच्या पोलिसांच्या कारस्थानावर न्यायालयाने बोट ठेवले होते आणि सरकारची कानउघाडणी केली होती. त्यामुळे पुणे पोलीस तोंडघशी पडले होते. तसेच सरकारी वकिलांना पोलिसांच्या कारनाम्याची कबुली द्यावी लागली होती. 

आरोपीला कठोर शिक्षा द्या!
अल्पवयीन आरोपीचा जामीन मंजूर झाल्यानंतर पत्रकारांनी जबलपूर येथे ममता कोस्टा यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांना आश्रू अनावर झाले होते. ममता कोस्टा म्हणाल्या, ‘‘आरोपीच्या सुटकेची बातमी ऐकून धक्काच बसला. न्यायालयाने हा निर्णय घेताना काहीतरी विचार केला असेल. पण न्यायमूर्तींना माझी विनंती आहे, ज्या आईने आपली मुलगी गमावली आहे त्या आईचे दुःख, वेदना समजून घ्या. या प्रकरणात योग्य न्याय झाला, आरोपीला कठोर शिक्षा दिली तरच जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहील,’’ अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;