झोप मोडल्याच्या रागातून बहिणीचा गळा दाबून खून, वैदूवाडीच्या घटनेने खळबळ
बेडरूमधील असलेला झोपेचा बिछाना घेण्यासाठी भावाने बहिणीला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास जागे केले. त्याच रागातून तरूणीने घरातून दोन वेळा बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. तिला समजावून पुन्हा घरात आणल्याचा राग आल्यामुळे तिने भावावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे झालेल्या भांडणातून भावाने अल्पवयीन बहिणीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना 17 जूनला मध्यरात्रीच्या सुमारास वैदूवाडीतील रिद्धी-सिद्धी अपार्टमेंटमध्ये घडली आहे.
साफिया सुलेमान अन्सारी (16, रा. वैदूवाडी, हडपसर ) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ शारीख सुलेमान अन्सारी (18, रा. वैदूवाडी) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. एपीआय दीपक बर्गे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
साफिया आणि शारीख बहीण -भाऊ असून वैदूवाडीतील रिद्धी -सिद्धी इमारतीत राहायला होते. 17 जूनला मध्यरात्री दोनच्या सुमारास शारीख घरी आला. त्यावेळी साफिया बेडरूमध्ये झोपली होती. शारीखला झोपण्यासाठी बिछाणा पाहिजे असल्यामुळे त्याने वारंवार बेडरूमचा दरवाजा वाजविला. त्याचा राग आल्यामुळे साफियाने दोन वेळा घराबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, शारीखने तिला घरात आणून समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने रागाच्या भरात चाकूने शारीखवर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली. त्यानंतर रागातून शारीखने गळा दाबून साफियाचा खून केला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान, शारीखने भांडणातून साफियाचा खून केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी हडपसर पोलीस तपास करीत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List