बाजारपेठेतील रस्त्याची दुरवस्था; नगर शिवसेनेची सह्यांची मोहीम

बाजारपेठेतील रस्त्याची दुरवस्था; नगर शिवसेनेची सह्यांची मोहीम

शहरातील कापड बाजार ते सर्जेपुरा रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत नगर शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सह्यांची मोहीम राबवून मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. महापालिकेने याबाबत तातडीने उपाययोजना केल्या नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नगर शहराच्या मध्यवर्ती भागातील कापड बाजार ते सर्जेपुरा ते लालटाकी या रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. अनेक छोटे-मोठे अपघात या ठिकाणी होत आहेत. नगरच्या बाजारपेठेत जिह्यातून नागरिक खरेदीसाठी येत असतात. येथील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत मनपाला वेळोवेळी निवेदने देऊनसुद्धा काही उपयोग झाला नाही. तरी या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, असे निवेदनात म्हटले आहे.

संभाजी कदम म्हणाले, या भागातील दुकानदार, व्यापारी, रहिवासी मोठय़ा प्रमाणात मनपाचा कर भरत आहेत. परंतु मनपा येथील समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. कापड बाजार ते सर्जेपुरा ते लालटाकी रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याबाबत वेळोवेळी शिवसेनेने पाठपुरावा केला; परंतु कोणतीही कार्यवाही होत नाही. आता नागरिक व व्यापारी रस्त्यांवर उतरून सह्यांची मोहीम हाती घेऊन या विरोधात शिवसेनेच्या माध्यमातून आवाज उठविला आहे. याउपरही जर मनपाने काही उपाययोजना केल्या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

याप्रसंगी युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, अमोल येवले, विजय पठारे, संतोष गेनप्पा, हर्षवर्धन कोतकर, रवि वाकळे, प्रशांत गायकवाड, दीपक खैरे, परेश लोखंडे, गौरव ढोणे, सुरेश तिवारी, अशोक दहीफळे, संदिप दातरंगे, दीपक भोसले, शाम कोके, अरुण झेंडे, मुन्ना भिंगारदिवे, अण्णा घोलप, बंटी खैरे, संतोष डमाळे, डॉ. श्रीकांत चेमटे, अभिजीत अष्टेकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;