माउलींच्या पालखी सोहळ्याची युद्धपातळीवर तयारी! लोणंदमध्ये 6 जुलैला आगमन; अडीच दिवसांचा मुक्काम

माउलींच्या पालखी सोहळ्याची युद्धपातळीवर तयारी! लोणंदमध्ये 6 जुलैला आगमन; अडीच दिवसांचा मुक्काम

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 6 जुलैला अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी लोणंद येथे आगमन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना सर्व प्रकारच्या सेवासुविधा पुरवण्यासाठी प्रशासन, लोणंद नगरपंचायत, विविध संस्था संघटना व नागरिकांसह सर्वच यंत्रणांनी सुसज्जता ठेवावी, वारकऱयांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, पालखी सोहळ्याची तयारी युद्धपातळीवर करून कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी केले.

श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे सहा जुलैला जिह्यात आगमन होत आहे. पालखी सोहळ्याचा लोणंदला सहा, सात व आठ जुलै रोजी अडीच दिवसांचा मुक्काम आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन व विविध संस्था, संघटना यांच्या वतीने वारकरी व भाविकांना पुरवण्यात येणाऱया सेवासुविधांच्या तयारीच्या आढावा बैठकीत तहसीलदार पाटील बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार चेतन मोरे, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, नगराध्यक्षा सीमा खरात, उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, नगरसेवक गणीभाई कच्छी, सागर शेळके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, वीज वितरणचे पाटील उपस्थित होते.

अजित पाटील म्हणाले, पालखी सोहळ्यातील वारकऱयांना वीज, पाणी, स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा या प्रमुख बाबी नेहमीप्रमाणे चांगल्या रीतीने पुरवून वारकऱयांच्या सेवेचा लाभ घ्यावा. यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई व हलगर्जीपणा न करता सेवाभाव ठेवावा तसेच पालखी सोहळा विश्वस्तांच्या सूचनांनुसार तयारी करावी लागणार आहे. सर्वच विभागांच्या वतीने कामे युद्धपातळीवर करून वेळेत पूर्ण करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्याधिकारी गायकवाड म्हणाले, बाजारतळावरील सार्वजनिक शौचालय पालखीकाळात सर्वांसाठी मोफत वापरासाठी खुले करण्यात येणार आहे. पाडेगाव जलशुद्धीकरण केंद्रावर पाणीपुरवठय़ाची सर्व यंत्रणा अद्ययावत ठेवण्यात येत आहे.

स्वागताची तयारी…

n खंडाळा पंचायत समितीच्या वतीने जिह्याच्या सीमेवरील स्वागत कमानीची रंगरंगोटी करून स्वागताची तयारी करण्यात येत आहे. सर्व रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या तोडून व खड्डे बुजवून डागडुजी करून व्यवस्था ठेवण्याच्या सूचनाही यावेळी तहसीलदार अजित पाटील यांनी दिल्या.

नीरा स्नानाच्या ठिकाणाची डागडुजी

n श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील नीरा नदीच्या दत्त घाटावर होणाऱया नीरा स्नानासाठी पादुका नीरा नदीत नेताना मोठी गर्दी होते. पायऱयांवरून नदीत उतरताना घसरले जाते, त्या ठिकाणी सिमेंटचे काँक्रीट करण्यात यावे, तर नीरा नदीवरील जुन्या पुलाचे कठडे अनेक ठिकाणी तुटले आहेत. या पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक लोखंडी जाळी लावण्याची सूचना ह.भ.प. बाळासाहेब चोपदार यांनी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;