सोलापुरात जातीय दंगली घडविण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न होता

सोलापुरात जातीय दंगली घडविण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न होता

सोलापूर लोकसभा    मतदारसंघातील निवडणूक ही आपल्या हातून गेल्याची जाणीव होताच निवडणुकीदरम्यान सोलापुरात हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करून जातीय दंगल घडवून 2002 ची पुनरावृत्ती करण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या स्थानिक नेतेमंडळींचा प्रयत्न होता, असा थेट आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. यावेळी पोलीस यंत्रणा सतर्क राहिल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. निवडणूक शांततेत पार पडली, असेही त्यांनी सांगितले.

दक्षिण सोलापूर तालुक्यात आयोजित कृतज्ञता मेळाव्यात बोलताना प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करीत थेट आरोप केला.

देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात दंगल घडवण्याचा डाव होता. लाकसभेची निवडणूक त्यांच्या हातून गेली म्हणून ही कटकारस्थानं त्यांनी केली. त्यांची मतदानाच्या अगोदरची पाच दिवसांची भाषणे काढून बघा. त्यांच्या हालचाली तशाच होत्या. मतदानाच्या दिवशी पोलीस आयुक्त सतर्क राहिले. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिलावळ रक्ताचं राजकारण करायला बघत होती. लाज वाटायला पाहिजे. चार हुतात्म्यांच्या शहरात येऊन आपल्यात भांडणे लावून दंगल घडविण्याचा प्रयत्न होता. मतमोजणीदिवशी काय झाले हे सर्वांना माहीत आहे. शेवटी पोलिसांनी उमेदवारांवर गुन्हे दाखल करतो, असा सज्जड दम दिल्यावर भाजप कार्यकर्ते पसार झाले. हे सर्व रेकॉर्ड आहे, असेही खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;