दुसऱ्या दिवशीही उशिरा येणाऱ्यांची गेटवरच ‘हजेरी’, नगर मनपातील 45 कर्मचाऱ्यांवर कारवाई

दुसऱ्या दिवशीही उशिरा येणाऱ्यांची गेटवरच ‘हजेरी’, नगर मनपातील 45 कर्मचाऱ्यांवर कारवाई

नगर महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी मनपा प्रशासकीय कार्यालयातील उशिरा येणाऱया अधिकारी, कर्मचाऱयांना कारणे दाखवा नोटीस बजावत 1 हजार रुपयांचा दंड केला होता. तरी आज दुसऱया दिवशी 155 कर्मचाऱयांपैकी 45 कर्मचारी कामावर उशिरा आले. या उशिरा येणाऱया कर्मचाऱयांची आज गेटवरच ‘हजेरी’ घेण्यात आली. यावेळी आयुक्त पंकज जावळे यांनी शेवटची वार्ंनग देत, कारवाईला तयार रहा, असा इशारा दिला आहे.

मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दुसऱया दिवशी पुन्हा एकदा आस्थापना विभागप्रमुख मेहेर लहारे यांना कर्मचाऱयांची गेटवर हजेरी घेण्यास सांगितले होते. यावेळी कार्यालयीन वेळ होऊन गेली तरीदेखील 45 अधिकारी, कर्मचारी वेळेत हजर झाले नाहीत. यावेळी आयुक्त यांनी मनपा कार्यालयात उशिरा येणाऱयांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच सर्व कर्मचाऱयांनी ओळखपत्र व युनिफॉर्ममध्ये कामावर यावे, अशा सूचना दिल्या.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;