इचलकरंजीचे आयुक्त दिवटे यांची बदली, आयुक्तपदी पल्लवी पाटील
महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची तडकाफडकी बदली करण्यात असून, त्यांच्याजागी सातारा येथील अधिकारी पल्लवी पाटील यांना पदभार घेण्याचे आदेश नगरविकास खात्याने दिले आहेत. दरम्यान, सायंकाळी पाटील यांनी पदभार स्वीकारला.
ओमप्रकाश दिवटे हे 11 महिन्यांपूर्वी आयुक्त म्हणून इचलकरंजी महापालिकेत 6 जुलै 2023 रोजी दाखल झाले होते. त्यांचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी बदली झाल्याने जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या बदलीच्या ठिकाणाचा उल्लेख नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दिवटे यांची अचानक बदलीमागे राजकीय कारण दडले आहे, अशी चर्चा सुरू आहे. दिवटे यांनी बदलीविरोधी मॅपमध्ये दाद मागण्याची तयारी केली आहे, असे सांगण्यात येत आहे.
प्रथम आयुक्त सुधाकर देशमुख, दुसरे आयुक्त म्हणून ओमप्रकाश दिवटे होते. दोघांचीही कारकीर्द अल्पच ठरली. नव्याने स्थापन झालेल्या या महापालिकेच्या आयुक्तांसाठी ‘हवामहल’ बंगल्याजवळ निवासस्थान बांधले असून, चारच दिवसांपूर्वी तेथे गृहप्रवेशाचा सोहळा झाला होता. या नवीन वास्तूचा शुभारंभ होण्यापूर्वीच बदली झाल्याने त्याचीही चर्चा होती. मात्र, बदलीमध्ये एका राजकीय नेत्याचा हात होता. यावर अनेक नेते ठाम आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List