ढाकणे यांना आमदार करण्यासाठी प्रयत्न करणार – निलेश लंके

ढाकणे यांना आमदार करण्यासाठी प्रयत्न करणार –  निलेश लंके

जे तुमच्या मनात आहे ते माझ्याही मनात असून येत्या विधानसभेला कोणत्याही परिस्थितीत प्रताप ढाकणे आमदार होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून तुम्ही फक्त मला साथ द्या असे आवाहन खासदार नीलेश लंके यांनी केले. लंके यांची खासदारपदी निवड झाल्या बद्दल त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

संस्कार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रताप ढाकणे,शिवशंकर राजळे,रफिक शेख,राजेंद्र दौण्ड,बंडुपाटील बोरुडे,नवनाथ चव्हाण,योगिता राजळे,नासिर शेख,सुभाष केकाण,माउली केळगंद्रे,गहिनीनाथ शिरसाठ,डॉ. राजेंद्र शिरसाठ,दिनकर पालवे,रत्नमाला उदमले हे उपस्थित होते. या वेळी लंके यांनी विखे यांच्यावर टीका करण्याचे टाळले. यावेळी बोलताना लंके म्हणाले की, ”पारनेर माझी आई तर पाथर्डी माझी मावशी आहे. मोहटा देवीवर आपली श्रद्धा असल्याने आपल्या प्रचाराची सुरवात आपण मोहटा देवीगडावरून केली तर प्रचाराची सांगता सभा सुद्धा पाथर्डीत केली. अवघ्या 14 वर्षाच्या राजकीय जीवनात आपण सरपंच ते खासदार झालो ते केवळ जनतेच्या जीवावर झालो आहोत. लोकांनी ही निवडणूक हाती घेतली होती. लोकांनी ज्या दुवा दिल्या त्या मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत विसरणार नाही. तालुक्यात पाणीटंचाई,बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत मात्र प्रशासनाला सोबत घेऊन आपण ते सोडवणार आहोत. ज्यांनी मला मते दिली नाही त्यांच्यावर सूड उगवण्याची काम आपण करणार नाही. देने वाले का भी भला,न देने वाले का भी भला ही आपली वृत्ती आहे. मी खासदार झालो यावर माझाच विश्वास बसत नाही”.

”विधानसभेला जिल्ह्यातून बारा आमदार निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. प्रताप ढाकणे यांना विधानसभेत मी प्रताप ढाकणे ईश्वरसाक्ष शपथ घेतो आहे अशी शपथ घेताना पाहायचे असेल तर कार्यर्त्यांनी आतापासूनच आपले गाव सांभाळण्याचे काम करावे.इच्छाशक्ती दांडगी असेल तर काहीही होऊ शकते. मी पहिल्यांदा ग्रामपंचायतीला उभा राहिलो तेव्हा माझ्या घरच्यांनीच मलाच वेड्यात काढले होते तर पंचायत समिती निवडणुकीत माझ्याकडे साधा मोबाईल सुद्धा नव्हता मात्र आता खासदार झालो आहे. छत्रपतींच्या राज्यात महिलांचा अपमान होतो ते चूक असून कोणीही जातिभेद करू नये तसेच महिला नेत्यांविषयी आदर बाळगण्याचे काम करावे. हा तालुका विचारी लोकांचा तालुका असून स्व. बबनराव ढाकणे यांच्या सारख्या नेत्याने या तालुक्याचे प्रतिनिधित्व केले असल्याचे शेवटी लंके म्हणाले. प्रास्ताविक शिवशंकर राजळे सूत्रसंचालन योगेश रासने तर आभार नासिर शेख यांनी मानले.

सत्तेची मस्ती असणाऱ्यांची मस्ती या निवडणुकीत लंके यांनी जिरवली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लंके यांच्या सारखा साधा उमेदवार दिला अन जनतेने पैसा व सत्तेला लाथ मारत लंके यांना निवडून दिले असल्याचे या वेळी प्रताप ढाकणे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;