खासदार लंके यांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला; अॅड. राहुल झावरे गंभीर जखमी, पारनेरमध्ये तणाव
लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांचे खंदे समर्थक, नीलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव अॅड. राहुल बबनराव झावरे यांच्यावर आज दुपारी पारनेर बसस्थानक चौकात प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ला करणाऱयांमध्ये विखे समर्थक माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, माजी नगरसेवक नंदकुमार सदाशिव औटी व इतर सात ते आठ जणांचा समावेश होता.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेले राहुल झावरे यांच्यावर पारनेर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. झावरे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समजताच नीलेश लंके यांच्या समर्थकांनी पारनेरकडे धाव घेतली. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी लंके समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला होता.
पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन
मारहाणीनंतर विजय औटी, नंदकुमार औटी तसेच मारहाण करताना उपस्थित असलेले त्यांचे सहकारी पारनेर पोलीस ठाण्यात गेले. लंके समर्थकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेत ठिय्या आंदोलन सुरू केले. मोठय़ा संख्येने असलेल्या लंके समर्थकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List