पुण्यातील संतापजनक घटना; नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाकडून पोलीस अधिकाऱ्याने पाय दाबून घेतले

पुण्यातील संतापजनक घटना; नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाकडून पोलीस अधिकाऱ्याने पाय दाबून घेतले

कल्याणीनगर चौकात नाकाबंदीदरम्यान अडविलेल्या दुचाकीस्वाराकडून येरवडा वाहतूक विभागातील एका पोलीस उपनिरीक्षकाने तरुणाकडून चक्क पाय दाबून घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे पुण्यात चाललंय काय? असा प्रश्न पडला आहे. व्हायरल व्हिडीओमुळे वाहतूक पोलिसांवर मोठय़ा प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पोलिसांनी रात्री वाहनचालकांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. भरधाव वाहन चालविणारे वाहनचालक, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून आता अचानक नाकाबंदी करण्यात येत आहे. त्यानुसार कल्याणीनगर परिसरात शनिवारी रात्री पोलिसांचे पथक वाहनांची तपासणी करीत होते. संबंधित उपनिरीक्षकाची रात्रपाळी होती. त्यांचे पथक मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कल्याणीनगर परिसरात ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ची कारवाई करीत होते. यादरम्यान रात्री घरी परतणारा तरुण पोलीस अधिकाऱ्याचे पाय दाबत असल्याचे चित्रीकरण कारमधील एकाने केले. रविवारी दुपारी सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाला. अनेकांनी वाहतूक पोलिसांच्या या प्रकारावर टीका केली.  त्यामुळे तरुणाकडून पाय दाबून घेणारा पोलीस अधिकारी कोण, असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर राज्यासह देशभरात कल्याणीनगरचे नाव झाले. त्यातच आता पाय दाबून घेतल्याची घटनादेखील कल्याणीनगर चौकात घडल्याने सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात पोलिसांवर टीका केली जात आहे.

वय 57, सलग 2 दिवस नाईट डय़ुटी

संबंधित उपनिरीक्षक हे येरवडा वाहतूक विभागात कार्यरत आहेत. दोन दिवस रात्री आणि दिवसा डय़ुटी केल्यामुळे त्यांची साखर 550 पर्यंत वाढली. त्यामुळे त्यांच्या पायात ‘व्रॅम्प’ आला आणि ते अचानक जमिनीवर बसले. व्हिडीओमधील तरुण त्यांची मदत करीत होता तरीही आम्ही वस्तुस्थितीची पडताळणी करीत आहोत, असे स्पष्टीकरण वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;