बाल न्याय मंडळही चौकशीच्या फेऱयात; बालविकास आयुक्तांनी नेमली समिती

बाल न्याय मंडळही चौकशीच्या फेऱयात; बालविकास आयुक्तांनी नेमली समिती

कल्याणी नगर येथील हिट अॅण्ड रन प्रकरणातील बिल्डरच्या अल्पवयीन आरोपी मुलाला अपघातावर निबंध लिहून तसेच वाहतूक विभागात काम करण्यास सांगून 15 तासांत जामीन देणाऱया बाल मंडळाच्या सदस्यांवरदेखील कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

पुण्यातील बाल न्याय मंडळाच्या सदस्यांच्या जुन्या रेकॉर्डची चौकशी होणार आहे. राज्याचे महिला व बालविकास आयुक्त प्रशांत नरनवरे यांनी ही समिती स्थापन केली आहे. बाल न्याय मंडळाच्या ज्या न्यायाधीशांनी हा निर्णय दिला आहे त्यांची आता चौकशी केली जाणार आहे. याशिवाय मंडळामध्ये एक मुख्य दंडाधिकारीदेखील असतो, ज्याची नियुक्ती न्यायपालिकेद्वारे केली जाते. तिन्ही सदस्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो.

आयुक्त नरनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अपघातावर 300 शब्दांत निबंध लिहिण्यास सांगून त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. या घटनेमुळे पुण्यात नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. तसेच यावर ‘सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात टीकादेखील करण्यात आली होती. काहींनी यावर तयार केलेले मीम्सदेखील व्हायरल झाले होते. त्यानंतर मोठय़ा प्रमाणात बाल न्याय मंडळावर टीका झाल्यावर ज्यांनी हा निर्णय दिला त्यांची चौकशी करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलाच्या या जामिनाला तीव्र विरोध झाल्यानंतर बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द केला होता. तसेच त्याला 5 जूनपर्यंत बाल न्याय मंडळाच्या देखरेख पेंद्रात पाठवण्यात
आले आहे.

 

ही समिती दोन्ही सदस्यांची जुनी प्रकरणे आणि त्यांनी दिलेल्या आदेशांची चौकशी करून 15 दिवसांत अहवाल सादर करणार आहे. या दोघांची नियुक्ती दीड वर्षांपूर्वी झाली असून या अहवालाच्या आधारे राज्य सरकार त्यांची नियुक्ती रद्द करू शकते, अशी माहिती नरनवरे यांनी दिली.

 

ससूनचे डॉ. तावरे, डॉ. हळनोर निलंबित; डीन विनायक काळे सक्तीच्या रजेवर

‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने 48 तासांत अहवाल सादर केला असून या प्रकरणी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांच्यासह शिपायाला निलंबित करण्यात आले आहे. पाठोपाठ ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण गांभीर्याने न घेतल्याबद्दल ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. त्यांचा पदभार बारामतीच्या अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. तावरे हे ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;