आंबेगाव तालुक्यात विद्यालयाच्या परिसरात बिबट्या; परिसरात खळबळ

आंबेगाव तालुक्यात विद्यालयाच्या परिसरात बिबट्या; परिसरात खळबळ

आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथे चक्क हिरकणी विद्यालयाच्या परिसरात बिबट्याची एण्ट्री झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हिरकणी विद्यालयाच्या जवळील परिसरात एक तासभर बिबट्या रेंगाळत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.

गावडेवाडी गावठाण हद्दीतच असणाऱ्या हिरकणी विद्यालयाच्या परिसरातच बिबट्या आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यालयातील हॉलीबॉल ग्राउंडवर गावातील काही तरुण व्हॉलीबॉल खेळत होते. त्यावेळी त्यांची नजर समोरून येणाऱ्या बिबट्यावर पडली. बिबट्या समोरून येतोय, हे पाहून सर्व तरुणांनी विद्यालयाच्या स्लॅपवर जाऊन बिबट्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. त्यावेळी विद्यालयाच्या बाजूने जाणाऱ्या विशाल गावडे व त्याच्या लहान मुलावर बिबट्याने झेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी तत्काळ गाडी जोरात पळविल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेची माहिती मिळताच बिबट रेस्क्यू सदस्य मनोज तळेकर यांनी घटनास्थळी जाऊन वनविभागाचे वनपाल प्रदीप कासारे यांच्याशी संपर्क साधला असता तत्काळ वनविभागाची टीम घटनास्थळी हजर झाली. यावेळी नागरिकांनी परिसरामध्ये पिंजरा बसविण्याची मागणी केली.

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे थैमान सुरूच
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात बिबट्याने थैमान घातले असून, बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. बिबट्याने हल्ला करून बकरीसह अन्य अनेक जनावरांचा फडशा पाडल्याच्या घटनादेखील गेल्या काही दिवसांत घडलेल्या आहेत. पूर्वी रात्रीच्या वेळी दिसणारा बिबट्या आता दिवसाढवळ्या फिरू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंबेगाव तालुक्यात एकाच दिवशी तीन ठिकाणी बिबट्याने दर्शन दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका घटनेत तर चक्क चिमुकल्याने आई-वडिलांना भू-भू दिसत आहे, असे सांगितल्यावर आई-वडिलांनी मागे पाहताच त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. आई-वडिलांनी मुलाला घेऊन तेथून पळ काढल्याने त्यांचा जीव बचावला.

पारगाव येथे मोटारसायकल चालकावर बिबट्याचा हल्ला
आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथेदेखील मोटारसायकल चालकावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिचगाई मळ्यात मोटारसायकलवर निघालेल्या संपत गेणभाऊ ढोबळे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. ढोबळे यांनी मोटारसायकल जोरात पळविल्याने सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही. या घटनेची वनविभागाने तत्काळ दखल घेऊन या ठिकाणी पिंजरा बसविल्याची माहिती माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी दिली.

शिरूरमध्ये ग्रामस्थांचे जागते रहो
पुणे जिल्ह्याच्या विविध भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनाचा फडशा पाडणाऱ्या बिबट्याचे माणसावरील हल्लेही वाढले आहेत. त्यामुळे सर्वत्र घबराट पसरली असून, ग्रामस्थांनी गस्त सुरू केली आहे.

शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचे पशुधनासह नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना घडत असल्याने वन विभागाच्या वतीने रात्रगस्त व त्यातून शेतकरी व नागरिकांनी बिबट्यापासून संरक्षण व खबरदारी या उपाययोजनांची जनजागृती करण्यात आली. नागरिक व शेतकऱ्यांमध्ये बिबट जनजागृती करत नागरिकांना बिबटपासून संरक्षण करण्याबाबतच्या उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे, तर नागरिकांना मार्गदर्शन करताना प्राण्यांवर बिबट्याचा हल्ला झाल्यास वनविभागाला माहिती द्यावी. शेतात काम करण्यासाठी एकट्याने जाऊ नये. शेतात घर असल्यास लहान मुलांना एकटे शाळेत पाठवू नये. सायंकाळच्या सुमारास मुलांना एकटे बाहेर सोडू नये. गोठा बंदिस्त ठेवावा. घराबाहेर व गोठ्यात उजेड ठेवावा. उसाच्या शेतालगत गुरे चरायला नेऊ नये. शेतात काम करताना आवाज करावा. मोबाईलवर गाणी लावावीत, यांसह आदी आवाहन वनविभागाच्या वतीने शेतकरी व नागरिकांना करण्यात आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;