नगर जिल्हा राशीनमध्ये मोठी कारवाई…710 किलो गोमांसासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त…

नगर जिल्हा राशीनमध्ये मोठी कारवाई…710 किलो गोमांसासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त…

नगर जिल्हातील कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये 710 किलो गोमांसासह 13 लाखांचा मुद्देमाल 13 लाख11 हजार रुपये किंमतीचे 710 किलो गोमांस, 57 गोवंशीय जिवंत जनावरे व 2 पिकअप असा मुद्देमाला जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा नगरच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.

आरोपी मध्ये सोहेल कुरेशी (फरार) व सुलतान कुरेशी (फरार) दोन्ही रा. कुरेशी मोहल्ला, राशिन, ता. कर्जत , शाहबाज आयुब कुरेशी रा. कुरेशी मोहल्ला, राशिन, ता. कर्जत (फरार) नाव आहे. पथक कर्जत परिसरात गोमांस वाहतुक व विक्री करणा-या इसमांची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत कुरेशी मोहल्ला, राशिन, ता. कर्जत येथे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल चालु आहे आता गेल्यास गोमास व कत्तलीसाठी आणलेली जिवंत जनावरे मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने प्राप्त माहिती पथकास देवुन खात्री करुन आवश्यक कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.

पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी कुरेशी मोहल्ला, राशिन, ता. कर्जत येथे जावुन खात्री करता एक इसम घरा समोरील पत्र्याचे शेडमध्ये गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करताना दिसला, पथक सदर इसमास पकडण्याचे तयारीत असतांना त्यास पोलीस पथकाची चाहुल लागताच तो गल्ली बोळीचा फायदा घेवुन पळुन गेला त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळुन आला नाही. त्यानंतर पथकाने पळुन गेलेल्या इसमाचे राहते घराचे आजु बाजूस त्याचे नाव गांव विचारले असता त्याचे नाव शाहबाज आयुब कुरेशी रा. कुरेशी मोहल्ला, राशिन, ता. कर्जत (फरार) असे असल्याचे समजले. सदर इसमाचे घरासमोरील पत्र्याचे शेड व आजु बाजूचे वाहनांची पाहणी केली असता जनावरांची कत्तल करुन ठेवलेले गोमास व कत्तलीच्या उद्देशाने मोकळ्या जागेत व 2 पिकअप वाहनात लहान मोठी जिवंत जनावरे मिळुन आली त्याबाबत विचारणा करता सदरची जिवंत जनावरे ही सोहेल कुरेशी (फरार) व सुलतान कुरेशी (फरार) दोन्ही रा. कुरेशी मोहल्ला, राशिन, ता. कर्जत यांचे मालकीची असुन कत्तली करीता आणलेली आहेत असे समजले.

सदरची कारवाई. पोलीस अधीक्षक राकेश ओला, नगर, प्रशांत खैरे पोलीस अधीक्षक, विवेकानंद वाखारे , उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिनांक 28 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/समाधान भाटेवाल तसेच अंमलदार दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, विशाल दळवी, संदीप दरंदले, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ व अरुण मोरे आदींसह अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

फरार आरोपीच्या घरासमोरील शेडमध्ये 1,42,000/- रुपये किंमतीचे 710 किलो गोमास, 4,69,000/- रुपये किंमतीची 57 लहान मोठी जिवंत गोवंशीय जनावरे व 7,00,000/- रुपये किंमतीचे 2 मालवाहु पिकअप असा एकुण 13,11,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सर्व मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द कर्जत पो.स्टे.गु.र.नं. 371/2024 गुन्हा दाखल करण्यात आला असुन. पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;