जबरदस्त ट्विस्ट ‘त्या’ पोर्शे कारमधील आमदारपुत्र कोण?

जबरदस्त ट्विस्ट ‘त्या’ पोर्शे कारमधील आमदारपुत्र कोण?

पुणे कल्याणीनगर येथील हिट अॅण्ड रन प्रकरणात पुण्यातील एका आमदाराच्या मुलाचाही समावेश होता, असा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. पटोले यांच्या या गौप्यस्फोटमुळे पुणे अपघातप्रकरणात जबरदस्त ट्विस्ट निर्माण झाला आहे.

नाना पटोले यांनी आज टिळक भवन मुख्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पुण्यातील हिट अॅण्ड रन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. या प्रकरणात वेदांत अग्रवाल आणि त्याचे बिल्डर पिता विशाल अग्रवाल यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु अपघात झाला त्यावेळी वेदांतबरोबर एका आमदाराचा मुलगाही होता. तो कोण होता? आणि या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न करणारा मिंधे सरकारमधील मंत्री कोण? त्याचेही नाव समोर आले पाहिजे, असे पटोले म्हणाले. आरोपी वेदांतच्या रक्ताचे नमुने बदलणारे ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे यांना अधीक्षक बनवण्यासाठी शिफारस करणारे मंत्री आणि आमदाराचेही नाव उघड झाले पाहिजे, असे ते म्हणाले.

सीबीआय चौकशी करा
बिल्डर पुत्र वेदांत अग्रवालबरोबर पोर्शे कारमध्ये आमदाराचा मुलगाही होता. तो कोण होता हेसुद्धा जगासमोर आले पाहिजे. या प्रकरणात गर्भश्रीमंत व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसत असल्याने या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फतच झाली पाहिजे, अशी मागणीही पटोले यांनी केली.

आरोपींना वाचविण्यासाठी फडणवीसांनी वकिली कावा वापरला!
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्दय़ावरून पटोले यांनी यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. पुणे कार अपघात प्रकरणानंतर आरोपींना वाचवण्यासाठी फडणवीस यांनी त्यांच्या वकिलीचा वापर केला. नागपुरात दोन मुलींनी दोन युवकांना गाडीखाली चिरडून मारले तरीही त्यांना दहा तासांत जामीन मिळाला. जळगावातही अशाच अपघातातील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला, असे सांगतानाच, काय चाललंय या राज्यात, असा संतप्त सवाल पटोले यांनी केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;