ससूनमधील डॉक्टरांच्या चौकशीसाठी डॉ. पल्लवी सापळे यांच्या नेतृत्वाखाली समिती

ससूनमधील डॉक्टरांच्या चौकशीसाठी डॉ. पल्लवी सापळे यांच्या नेतृत्वाखाली समिती

पुणे कल्याणीनगर येथील हिट अॅण्ड रन प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी रक्तनमुन्यांची अदलाबदल केल्याचे उघड झाले. त्यानंतर त्या डॉक्टरांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी चौकशीसाठी सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

डॉ. पल्लवी सापळे यांच्यासह या चौकशी समितीमध्ये सर जे. जे. रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्राध्यापक डॉ. गजानन चव्हाण आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांचा समावेश आहे. आज हे चौकशी पथक ससून रुग्णालयात पोहोचले. आतापर्यंत याप्रकरणी डॉ. अजय तावरे, डॉ. हरणोळ यांच्यासह एका शिपायाला अटक करण्यात आली आहे. आरोपीला रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्या संपका&त आलेले डॉक्टर्स, शिपाई, तंत्रज्ञ, परिचारिका व अन्य कर्मचारी तसेच आरोपी फॉरेन्सिक विभागात असताना तिथे उपस्थित कर्मचारीवर्ग आणि त्या कालावधीत विभागात ये-जा केलेल्या व्यक्ती यांच्याकडून ही समिती संपूर्ण माहिती जमा करत आहे. चौकशीला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही, पण सर्व नियमांचे काटेकोर पालन करून, कोणत्याही दबावाखाली न येता निःपक्षपातीपणे चौकशी केली जाईल, असे या समितीने स्पष्ट केले आहे.

वडील आणि आजोबांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये  छेडछाड केल्याचे उघड, 31 मेपर्यंत कोठडी वाढवली

भरधाव वेगाने कार चालवून दुचाकीला धडक देत तरूण-तरूणीच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या प्रकरणी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या वडीलांनी आणि आजोबांनी त्यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याचे तपासात समोर आले आहे. त्या अनुषंगाने त्यांच्याकडे तपास केला असता दोघे तपासात सहकार्य करत नाही, अशी माहिती पोलीसांनी आज (दि. 28) न्यायालयाला दिली. दरम्यान, न्यायालयाने दोघांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अपघाताचा गुन्हा स्वतŠवर घेण्यासाठी चालकावर दबाव टाकून त्याचे अपहरण करून डांबून ठेवल्या प्रकरणी आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवार (77) आणि वडील विशाल अग्रवाल (50) यांना गुन्हे शाखेने अटक केली होती. सुरेंद्रकुमार यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपली. तर, विशाल यांना या गुन्हात सोमवारी अटक करण्यात आली. या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणी चालक गंगाधर हेरीक्रुब (42) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपींनी चालकाचे अपहरण करण्यासाठी वापरलेली बीएमडब्ल्यू कार जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी चालकाकडून त्याचा पह्न जबरदस्तीने काढून घेतला होता. त्याबाबत आरोपींकडे विचारणा केली असता, ते उडवा-उडवीची उत्तरे देत आहेत. त्यांना विश्वासात घेऊन तो मोबाईल जप्त करायचा आहे. हा गुन्हा करताना आणखी कोणी मदत केली आहे का? याबाबत तपास केला असता ते खात्रीशीर माहिती देत नसून, तपासात सहकार्य करत नाहीत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी न्यायालयाला दिली.

दरम्यान, गुह्याची व्याप्ती मोठी असून, सखोल तपास होणे गरजेचे आहे. दोघांकडे एकत्रित तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील नीलेश लडकत यांनी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत दोघांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

त्या पब मालकांचा जामिनासाठी अर्ज

अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना मद्य पुरविल्या प्रकरणी अटकेत असलेले कोझी ब्लॅक पबच्या मालकांसह कर्मचाऱयांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;