पिंपळे सौदागर येथे लवकरच नवीन पोस्ट ॲाफीस कार्यालय सुरू होणार ; नाना काटे यांच्या पाठपुराव्यास यश

नागरिकाची पोस्ट ॲाफीसची वणवण आता संपणार

पिंपळे सौदागर येथे लवकरच नवीन पोस्ट ॲाफीस कार्यालय सुरू होणार ; नाना काटे यांच्या पाठपुराव्यास यश

रहाटणी, पिंपळे सौदागर येथे लवकरच नविन पोस्ट ॲाफीस सुरू होणार असुन त्यासाठी भारतीय डाकघर विभाग व महापालिका यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत पत्रव्यवहाराद्वारे तसे कळविले आहे.

पिंपरी : रहाटणी पिंपळे सौदागर येथे लवकरच नविन पोस्ट ॲाफीस सुरू होणार असुन त्यासाठी भारतीय डाकघर विभाग व महापालिका यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत पत्रव्यवहाराद्वारे तसे कळविले आहे.

नाना काटे यांनी पोस्ट ॲाफीस व महापालिका विभागा यांना दिलेल्या पत्रात असे नमुद केले की, प्रभाग क्र २८ रहाटणी पिंपळे सौदागर या प्रभागत ८० हजार ते १ लाख व त्यापेक्षा जास्त लेकसंख्या आहे, या परिसरात खासगी, व सरकारी शाळा, महाविद्यालये, तसेच संरक्षण विभागाचे कार्यालय, निवास्थान, सरकारी व खासगी बॅकाचे व आयटी पार्कचे कार्यालय आहेत. परिसरातील नागरिकांना पोस्ट ॲाफीस बाबत कामे करण्यासाठी,औधं किंवा पिंपरी, चिचवड च्या पोस्ट ॲाफीस मध्ये जावे लागत असल्याने नागरिकांना याचा त्रास व मोठी गैरसोय होत असल्याचे पोस्ट ॲाफीस विभाग व मनपा विभाग यांच्या निदर्शनास आणुन दिले होते, त्यासाठी रहाटणी पिपंळे सौदागर येथे नविन पोस्ट सुरू व्हावे, यासाठी २०१२ पासून पत्रव्यवहार देखील नाना काटे व शितल काटे यांनी वेळोवेळी पोस्ट ॲाफीस विभाग व महापालिका यांच्याकडे केला होता व सातत्याने प्रयत्न देखील करीत होते.

त्यांना नवीन पोस्ट ऑफिससाठी लागणारी महापालिकेची पर्यायी जागा देखील सुचविली होती त्याची पाहणी देखील मनपा व पोस्ट विभागाच्या अधिकारी वर्सोगाबत केली होती. त्याचेच यशप्राप्त म्हणुन त्यास अनुसरून पोस्ट ॲाफीस विभाग व महापालिका यांनी रहाटणी पिपंळे सौदागर येथे नविन सुरू करण्याच्या प्रशासकीय कामास सुरूवात करण्यात आली आहे तसे पत्राद्वारे देखील त्यांनी कळविले आहे. त्यामुळे रहाटणी पिपंळे सौदागर परिसरात नवीन पोस्ट ऑफिस सुरु होणार असल्याने नागरिकाची पोस्ट ॲाफीसची वणवण आता संपणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;