पुण्यातील ससून रुग्णालय बनलेय ‘गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?’ विजय वडेट्टीवार यांचा सवाल

पुण्यातील ससून रुग्णालय बनलेय ‘गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?’ विजय वडेट्टीवार यांचा सवाल

पुण्याच्या ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणातील आरोपी बिल्डर पुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचे उघड झाले. या प्रकरणी दोन डॉक्टर आणि एका शिपायाला पोलिसांनी अटक केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला असून ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की ‘गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा,’ असा सवाल केला.

ससून रुग्णालयात गेल्या काही वर्षांत असे बरेच गैरप्रकार घडले आहेत. ड्रग्ज माफिया ललित पाटीलचे धंदे याच हॉस्पिटलमधून सुरू होते. ललित पाटीलचे अवैध धंदे सरकारमधील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरू होते हे महाराष्ट्राला माहिती आहे. ललित पाटील प्रकरणापासून या हॉस्पिटलच्या कारभारावर आधीच शंका होती, पण सरकार आणि रुग्णालय प्रशासनाने या शंकेवर आता शिक्कामोर्तब केले असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

दारू पिऊन दोन लोकांची हत्या करणाऱ्याला मदत करण्यासाठी किती जणांनी मेहनत घेतली हे चौकशीतून समोर येत आहे. या सर्वांना कठोर शिक्षा व्हायला हवी म्हणून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. आरोपीला वाचवणारे पोलीस आणि रुग्णालयातील सर्वांचीच चौकशी व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;