मिंधे सरकारच्या राजवटीत भ्रष्टाचाराला ऊत, कोट्यवधींचे डील… आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले,ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक

मिंधे सरकारच्या राजवटीत भ्रष्टाचाराला ऊत, कोट्यवधींचे डील… आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले,ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक

मिंधे सरकारच्या काळात राज्यात भ्रष्टाचाराला ऊत आला असून, सर्व शासकीय यंत्रणाच पोखरली गेली आहे. पुण्यातील भयंकर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी ससूनच्या फॉरेन्सिक विभागप्रमुखाने मुख्य वैद्यकीय अधिकाऱयाच्या मदतीने आरोपीच्या रक्ताचे नमुने थेट डस्टबीनमध्ये फेकून दिले. त्याऐवजी दुसऱयाच रुग्णाचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी दिले. त्यासाठी कोटय़वधी रुपयांची सेटिंग झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने फॉरेन्सिक विभागप्रमुखासह दोघा डॉक्टरांना अटक केली आहे.

अल्पवयीन आरोपीचे वडिल विशाल अगरवालकडून 3 लाख रुपये घेणाऱया ससूनच्या अमित घटकांबळे या शिपायालाही पोलिसांनी गजाआड केले आहे. तो ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात काम करतो. दरम्यान, या तिघा आरोपींना न्यायालयाने 30 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत ससून शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवरील कारवाईबाबात माहिती दिली. फॉरेन्सिक विभागप्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहारी हळनोर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

बिल्डर विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने 19 मे रोजी पहाटे मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार भरधाव वेगाने चालवून दोघांना चिरडले. त्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. या भयंकर अपघाताचे देशभर पडसाद उमटले. मात्र, अपघात झाल्यापासूनच पुण्यातील सरकारी यंत्रणांची भूमिका संशयास्पद राहिली. दोन दिवसांपूर्वी येरवडा पोलीस ठाण्यातील दोघा अधिकाऱयांना निलंबित केले.

विशाल अगरवालचा डॉ. अजय तावरेला फोन

अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीला दि. 19 रोजी दुपारी वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. आरोपीने मद्यधुंद अवस्थेत अपघात केला होता. त्यामुळे आरोपीच्या रक्त तपासणीत दारूचा अंश निघणार हे स्पष्ट होते. विशाल अगरवालने ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागप्रमुख डॉ. अजय तावरेला फोन करून आर्थिक सेटिंग केली. त्यावेळी रजेवर असलेल्या डॉ. तावरेने हस्तक्षेप करीत ससूनचा मुख्य वैद्यकीय अधिकारी श्रीहारी हरलोरला पह्न केला. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने ताब्यात घेऊन फेकून दे, असे सांगितले. त्यानुसार आरोपीचे ब्लड सॅम्पल डस्टबीनमध्ये फेकले आणि त्याच्या जागी दुसऱयाच रुग्णाचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी दिल्यामुळे अल्पवयीन आरोपीच्या रक्त चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला.

सीसीटीव्ही, डीव्हीआर जप्त

रक्तचाचणी करण्यासाठी अल्पवयीन मुलाला दि. 19 मे रोजी ससूनमध्ये दाखल केले होते. त्यावेळेसचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत. नेमके त्यादिवशी फॉरेन्सिक विभागात काय घडले, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी ससूनमधील सीसीटीव्हींचे डीव्हीआर जप्त केले आहेत. त्याअनुषंगाने तपास करून, दोषीविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.

डीएनएचे नमुने जुळले

रक्ताच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलगा आणि त्याच्या वडिलाच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी औंध रुग्णालयात पाठविली. तेथे डीएनए चाचणी केली. दोघांचे डीएनए नमुने जुळले असून, त्यानुसार आता कारवाई केली जाणार आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

डॉक्टरांकडून कबुली

विशाल अगरवालने डॉ. अजय तावरेला फोन केल्याचे तपासात उघड झाले आहे. दोघा डॉक्टरांना ताब्यात घेऊन चौकशी केली. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने फेकून दिल्याची कबुली त्यांनी दिली आहे. अपघातप्रकरणी 304 मधील गुह्यात आता 120 ब अंतर्गत 467, 201, 2013, 214 ही कलमे वाढविण्यात आली आहेत. आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांकडून कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आयुक्त अमितेश यांनी सांगितले.

ससूनच्या अधीक्षकपदी डॉ. तावरेंची नियुक्ती करा! आमदार टिंगरेंचे पत्र; मुश्रीफांची शिफारस व्हायरल

डॉ. अजय तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करा, असे अजित पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना केलेली शिफारस आणि त्या पत्रावर मुश्रीफ यांनी मारलेला शेरा व्हायरल झाला आहे.

अपघातानंतर अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी तब्बल 2 ते 5 कोटी रुपयांची सेटिंग झाल्याचे बोलले जात आहे. सर्वाधिक रक्कम फॉरेन्सिक विभागप्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना दिली जाणार होती. अटकेतील बिल्डर विशाल अगरवालचे डॉ. तावरेसोबत संबंध आहेत. अपघातानंतर त्यांच्यात फोनवरून संवाद झाला असून, त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे.

कोणाचा दबाव, नावे उघड करणार

रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससूनचे डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांची चौकशी करण्यात येत आहे. पोलीस चौकशी दरम्यान ‘मी शांत बसणार नाही. मी सगळ्यांची नावे घेणार’, अशी धमकी डॉ. तावरे याने दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. डॉ. तावरे कोणा-कोणाचे नाव उघड करतो याकडे लक्ष लागले आहे. डॉ. तावरे याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अतुल घटकांबळे याला अटक केल़ी या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचे नाव त्याने घेतले आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. एका लोकप्रतिनिधीने डॉ. तावरेला आरोपी मुलाला मदत करण्याबाबत सांगितल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. हा लोकप्रतिनिधी कोण? याकडे आता लक्ष लागले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;