दूधगंगा धरणगळती दुरुस्तीची वर्कऑर्डर काढा; अन्यथा जलसमाधी! शिवसेनेचे पाटबंधारे अधीक्षक अभियंत्यांना निवेदन

दूधगंगा धरणगळती दुरुस्तीची वर्कऑर्डर काढा; अन्यथा जलसमाधी! शिवसेनेचे पाटबंधारे अधीक्षक अभियंत्यांना निवेदन

दूधगंगा धरणगळती दुरुस्तीप्रकरणी 3 जूनपूर्वी वर्कऑर्डर काढावी; अन्यथा धरणामध्ये जलसमाधी घेऊ, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज देण्यात आला. याबाबतचे निवेदन पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांना देण्यात आले.

सन 1999 साली 1220 मीटर लांबीच्या दूधगंगा धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. सध्या या धरणामधून पाणीगळती सुरू आहे. कोणत्याही धरणाची गळती सर्वसाधारणपणे 70 लिटर/सेकंदांच्या वर वाढली तर त्या धरणास ती धोकादायक ठरते. सन 2007 साली दूधगंगा धरणातून 360.50 लिटर प्रतिसेकंद या प्रमाणात गळती होत होती. राज्य शासनाच्या आदेशाने सन 2010 ते 2014 या कालावधीत दगडी धरणाच्या एकूण मोनोलीतमध्ये सिमेंट ग्राऊंटिंगचे गळती प्रतिबंधक काम करण्यात आले. त्यानंतर 2016 साली संचयपातळीत 166.66 लिटर प्रतिसेकंद इतकी गळती आढळून आली.

अधीक्षक अभियंता धरण सुरक्षित संघटना (नाशिक) यांनी 2021मध्ये केलेल्या पाहणीत ही गळती वाढत जाऊन 264 लिटर प्रतिसेकंद असल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी कृष्णा खोरे विकास मंडळ, पुणेअंतर्गत गळती प्रतिबंधक योजनेअंतर्गत विशेष दुरुस्तीसाठी 80 कोटी 72 लाख 11 हजार 854 रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला; पण अद्यापि धरणगळतीच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली नाही. दूधगंगा धरणगळतीवर तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या 3 जूनपूर्वी या कामाची वर्कऑर्डर न मिळाल्यास धरणामध्ये जलसमाधी घेण्यात येईल, असा इशारा उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.

यावेळी सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, विशाल देवकुळे, राजेंद्र पाटील, मंजित माने, सुशील भंदिगिरे, शशिकांत बीडकर, सुनील मोदी, सुरेश चौगले, उत्तम पाटील, बाजीराव पाटील, संभाजी भोकरे, दिनेश परमार, महादेव कुकडे, राजू यादव, संजय जाधव, दिनेश साळोखे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;