कोल्हापूर विभागात सातारा जिल्हा दुसऱया स्थानी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सातारा जिह्याचा निकाल 97.19 टक्के लागला. कोल्हापूर विभागात जिह्याने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालामध्येही मुलांपेक्षा मुलीच सरस असल्याचे सिद्ध झाले आहे.
बारावीच्या परीक्षेच्या निकालानंतर सर्वांचेच लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले होते. आज दुपारी दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. रेकॉर्डब्रेक निकाल लागल्याने विद्यार्थ्यांसह पालकांच्या चेहऱयावर आनंद पाहायला मिळाला.
सातारा जिह्यात 739 शाळा असून, परीक्षा केंद्रांची संख्या 116 होती. जिह्यात परीक्षेला बसलेल्या 37 150 विद्यार्थ्यांपैकी 36108 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रिपिटर विद्यार्थ्यांमध्ये कोल्हापूर विभागात सातारा जिह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. पुनःप्रविष्ठ म्हणून परीक्षेला बसलेल्या 652 विद्यार्थ्यांपैकी 442 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल 67.79 टक्के लागला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List