नगर जिह्यात पारनेर तालुका ठरला अव्वल; जिह्याचा निकाल 95.27 टक्के
राज्य माध्यमिक शिक्षण महामंडळाने घेतलेल्या दहावी (एसएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात नगर जिह्याचा निकाल 95.27 टक्के लागला. जिह्यात पारनेर तालुक्याने बाजी मारली असून, पारनेर तालुक्याचा निकाल 96.53 टक्के, सर्वांत कमी 92.52 टक्के निकाल श्रीरामपूर तालुक्याचा लागला. निकाल लागल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
नगर जिह्यात एकूण 67 हजार 970 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यात 37 हजार 393 मुले, तर 30 हजार 577 मुलींचा समावेश होता. त्यापैकी 35 हजार 097 मुले व 29 हजार 664 मुली असे मिळून एकूण 64 हजार 761 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
जिह्याचा तालुकानिहाय निकाल ः अकोले 96.36 टक्के, जामखेड 96.50 टक्के, कर्जत 95.99, कोपरगाव 94.33, नगर 95.33, नेवासा 95.73, पारनेर 96.53, पाथर्डी 95.73, राहाता 94.43, राहुरी 93.23, संगमनेर 95.60, शेवगाव 95.89, श्रीगोंदा 96.42 टक्के, श्रीरामपूर 92.52 टक्के.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List