Pune porsche accident : ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना बेड्या; ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप

Pune porsche accident : ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना बेड्या; ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप

पुणे शहरातील कल्याणीनगर अपघातप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोर्शे कारने तरुण-तरुणीला चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक लॅबचे एचओडी डॉ. अजय तावरे आणि अन्य एका डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली असून ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

कल्याणीनगर परिसरात अल्पवयीनाने बेदरकारपणे पोर्शे कार चालवून तरूणीसह दोघांचा जीव घेतल्याची घटना रविवारी 19 मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत असून धनिकपुत्राच्या सेवेसाठी कोणीकोणी पुढाकार घेतला हे देखील समोर येत आहे.

उद्योजक विशाल अग्रवाल याने लाडक्या मुलाला वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची मदत घेतल्याचा आरोप होत होता. त्यानंतर दोन पोलिसांचे निलंबनही करण्यात आले. तसेच या धनिकपुत्रासाठी ससूनमधील डॉक्टरही राबल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याच्या आरोपातून ससूनमधील फॉरेन्सिक लॅबचे एचओडी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली आहे.

धंगेकरांचे ट्विट

पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा 7 दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता. याच ससूनमध्ये मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवगृहात ठेवा आमची अँब्युलन्स येत आहे, अशी विनंती केली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने अर्धा तास वाढवून द्यायला देखील नकार दिला होता. असो, हे वाटतं तेवढे सोप्पं नाहीये. त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले आहेत. जे आता हळू हळू जगासमोर येतील, असे ट्विट काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी केले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;