अगरवालची गुन्हे शाखेकडून चौकशी

अगरवालची गुन्हे शाखेकडून चौकशी

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांची पुणे गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबियांचा छोटा राजनशी संबंध असल्याच्या संशयावरून गुरूवारी सुरेंद्रची चौकशी करण्यात आली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुरेंद्र अग्रवालला गुरूवारी पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलवले होते. कुख्यात छोटा राजनसोबत असलेल्या संबंधाच्या आरोपावरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांकडून सुरेंद्रची चौकशी करण्यात आली. भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात अगरवाल यांनी छोटा राजनचा मदत घेतली होती. सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवालने मुलाला वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले होते का? याचीदेखील चौकशी  पोलिसांकडून केली जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;