कोझी, ब्लॅक पबला ठोकले सील

कोझी, ब्लॅक पबला ठोकले सील

कल्याणीनगर अपघात प्रकरणात सहभागी अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना दारू पुरवल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर मॅरियट सूट (ब्लॅक) या दोन्ही पब आस्थापनांचे व्यवहार तत्काळ प्रभावाने बंद केले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असून आस्थापना सील केल्या आहेत. मुंढव्यातील कोझी आणि ब्लॅक या पबमध्ये पार्टी केली. संबंधित मुलगा आणि इतर हे अल्पवयीन असूनही त्यांना दारू पुरविल्याप्रकरणी पोलिसांनी पब व्यवस्थापक यांच्याविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटकदेखील केली आहे. या प्रकरणात संबंधित पबविरोधात उत्पादन शुल्क विभागाने चार्जशीट दाखल केली होती.

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी भलताच डाव

अटकेची टांगती तलवार टाळण्यासाठी ब्रह्मा बिल्डर्सचे मालक विशाल अगरवालने पंचतारांकित हॉटेलची बुकिंग करून वाहनचालकाला तिथे ठेवले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वतŠ साध्या हॉटेलमध्ये राहायला गेला. छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन परिसरात अत्यंत साधे हॉटेल आहे. त्याच हॉटेलमध्ये विशाल पोलिसांना गुंगारा देऊन थांबला होता.  मात्र, पोलिसांनी ड्रायव्हर चत्रभुज बाबासाहेब डोळस आणि राकेश पौडवाल यांना पंचतारांकित हॉटेलमधून ताब्यात घेतले. त्यानंतर माहितीच्या आधारे अगरवालला हॉटेलमधून ताब्यात घेत अटक केली आहे.

मुलगा दारू पितो हे माहीत असतानाही पार्टीला परवानगी

पुण्यातील ब्रह्माकॉर्प बांधकाम उद्योग समूहाचे प्रमुख विशाल अग्रवाल  यांनी मुलगा अल्पवयीन असूनही त्याला मोटार चालवायला दिली होती. याबद्दल पोलिसांनी  त्यांच्याविरुद्ध मोटर वाहन अधिनियम कलम 3, 5 आणि 199 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तसेच  मुलगा  दारू पितो हे माहीत असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिली. याची माहिती वडिलांना असल्याचे मुलानेही पोलिसांना सांगितले आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;