बिल्डर विशाल अगरवालला बेडय़ा; पब मालक कोठडीत, हिट ऍण्ड रन प्रकरणी गुन्हे शाखेची कारवाई

बिल्डर विशाल अगरवालला बेडय़ा; पब मालक कोठडीत, हिट ऍण्ड रन प्रकरणी गुन्हे शाखेची कारवाई

दारूच्या नशेत भरधाव मोटार चालवून दोघांचा बळी घेणाऱया अल्पवयीन मुलाचा बाप असलेल्या बांधकाम व्यावसायिकाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने संभाजीनगरमधून अटक केली आहे. हिट अॅण्ड रन प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर व्यावसायिक पसार झाला होता. मात्र, सोशल मीडिया, स्थानिक नागरिक, पत्रकारांनी मांडलेल्या सडेतोड भूमिकेमुळे पोलीस प्रशासनाला झुकावे लागले आहे. त्यासोबतच अल्पवयीनाला मद्य पुरविणारे बार मालक, व्यवस्थापकांनाही पोलिसांनी जेरबंद केले आहे.

बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल (रा. वडगाव शेरी)   हॉटेल काझीचे मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप रमेश सांगळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्याणीनगर परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास विनानंबर असलेल्या अलिशान मोटार चालकाने दुचाकीस्वाराल धडक दिली. त्यामुळे गंभीररीत्या जखमी झालेल्या दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया यांना जीव गमवावा लागला. अपघातानंतर येरवडा पोलिसांनी मद्यधुंद अल्पवयीनाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. त्या ठिकाणी भेटीसाठी गेलेल्या आरोपीच्या नातेवाईकांनी त्याला पिझ्झा बर्गरची पार्टी दिली. पोलिसांनी अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल करून बालन्यायालयात हजर केले. मात्र, त्याला अवघ्या 12 ते 15 तासांत जामीन मिळाला. या प्रकरणात पोलिसांसह आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून गुह्यात सेटिंगचा डाव नागरिकांनी उधळून लावला.

आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता, तो संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सतीश गोवेकर, एसीपी सुनील तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, महेश बोळकोटगी, भरत जाधव, एपीआय राजेश माळेगावे, एपीआय अनिकेत पोटे यांनी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;