जनतेमध्ये संताप… नाराजी, तरीही फडणवीसांकडून पुणे पोलिसांना ‘क्लीन चिट’!

जनतेमध्ये संताप… नाराजी, तरीही फडणवीसांकडून पुणे पोलिसांना ‘क्लीन चिट’!

कल्याणीनगर परिसरातील भयंकर अपघाताचे पडसाद राज्यभर उमटत असून, आरोपीला अवघ्या 15 तासांत जामीन मिळाल्यामुळे पुणे पोलिसांच्या कारभारावर चीड, संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे. विरोधी पक्षांनीही पोलीस अधिकाऱयांवर कडक कारवाईची मागणी केली. त्यामुळे अखेर आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे पोलीस आयुक्तालयात आले आणि अपघाताच्या घटनेचा आढावा घेतला. मात्र, पत्रकार परिषदेत गृहमंत्र्यांनी पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याचे सांगत क्लीन चीटही देऊन टाकल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

पत्रकार परिषदेत सुरूवातीलाच या अपघाताच्या घटनेबद्दल लोकांमध्ये संताप आणि नाराजी असल्याची कबुली गृहमंत्री फडणवीस यांनी दिली. अपघाताच्या पहिल्या दिवसापासून पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. अल्पवयीन आरोपीवर 304 अंतर्गत गुन्हा दाखल करून बाल न्याय बोर्डापुढे हजर केले. मात्र अल्पवयीन आरोपीला काही तासांतच जामीन झाला. बाल न्याय बोर्डाचा हा निर्णय धक्कादायक असून, आम्हाला आश्चर्यचकीत करणारा आहे. याबाबत पुर्नेविचार करण्यासाठीचा अर्ज बोर्डाकडे दाखल केला आहे. त्यासंदर्भाचा निर्णय आल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जनतेच्या रेटय़ामुळे पुणे पोलिसांना बोटचेपी भूमिका बदलावी लागली. पत्रकार परिषदेला येताना गृहमंत्री फडणवीस आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे नजर चुकवत खाली मान घालून आले. त्यांची देहबोली बरेच काही सांगून गेली.

 

पिझ्झाबर्गर दिले असल्यास येरवडा पोलीस ठाणेच निलंबित करणार

आरोपीच्या नातेवाईकांनी येरवडा पोलीस ठाण्यातच अल्पवयीन आरोपीला खाण्यासाठी पिझ्झा बर्गर आणून दिले होते. याप्रकरणी नागरिकांसह राजकीय पदाधिकाऱयांनी टीकेची झोड उठविली याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले, सहायक पोलीस आयुक्तांकडून प्रकरणाची चौकशी केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पिझ्झाबर्गर दिल्याचा प्रकार घडलेला असल्यास संपूर्ण येरवडा पोलीस ठाणे निलंबित करण्यात येईल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;