खरिपाच्या क्षेत्रात 15 टक्के वाढ प्रस्तावित, कृषी विभागाकडून खते, बियाणांचे नियोजन

खरिपाच्या क्षेत्रात 15 टक्के वाढ प्रस्तावित, कृषी विभागाकडून खते, बियाणांचे नियोजन

सध्या कमी-अधिक पडणारा अवकाळी पाऊस व यंदा हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा वर्तवलेला अंदाज लक्षात घेता कृषी विभागाने खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा खरिपाच्या क्षेत्रात मागील वर्षीपेक्षा 15 टक्के वाढ अपेक्षित असून, 7 लाख हेक्टर क्षेत्र खरिपासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. यात सोयाबीनचा पेरा दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने कृषी विभागाने बियाणे व खते मुबलक उपलब्ध होतील, याची खबरदारी घेतली आहे.

नगर जिह्यात 15 जून ते 15 ऑगस्ट हा खरीप हंगाम पेरणीचा कालावधी असून, जिह्याच्या भौगोलिक रचना आणि होणाऱया पर्जन्यमानानुसार खरीप हंगामातील पिकांची निवड झालेली आहे. यात दक्षिण जिह्यात प्रामुख्याने कडधान्य पिके घेतली जातात. तर उत्तरेतील अकोले आणि पारनेर तालुका वगळता उर्वरित सर्व तालुक्यांत नगदी पीक म्हणून सोयाबीन, कपाशीचे पीक घेण्यात येते. नगर जिल्हा प्रामुख्याने रब्बी हंगामाचा जिल्हा आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत जिह्यात खरिपाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झालेली आहे. खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढत असून, या दोन पिकांमुळे कमी कालावधीत शेतकऱयांना फायदा होतो. याशिवाय भात, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद या पिकांनाही शेतकरी पसंती देतात. जिह्यात सरासरी 5 लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या होतात. मात्र, गेल्या तीन वर्षांत त्यात वाढ होत आहे. मागील वर्षी 5 लाख 86 हजार हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती. यंदा त्यात 15 ते 17 टक्के वाढ होऊन 7 लाख 2 हजार हेक्टरवर खरिपाच्या लागवडीची शक्यता आहे.

दीड लाख टन खत शिल्लक

सन 2024 च्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने 2 लाख 80 हजार टन खताची मागणी शासनाकडे केली. त्यातील 2 लाख 32 हजार आवंटन मंजूर झाले आहे. दरम्यान, यात मागील वर्षीची शिल्लक 1 लाख 24 हजार 725 टन आहे. 1 एप्रिलपर्यंत 20 हजार 900 टन खत प्राप्त झाले. आतापर्यंत त्यातून 4 हजार 526 टन खतांची विक्री झाली. सध्या 1 लाख 47 हजार 572 टन खते उपलब्ध आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;