कांद्याचा भाव वाढेना; शेतकऱ्यांचा खर्चही निघेना

कांद्याचा भाव वाढेना; शेतकऱ्यांचा खर्चही निघेना

कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्यानंतरही कांद्याचे भाव वाढत नाहीत. विक्रीतून शेतकऱयांचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान, एक नंबर कांद्याच्या भावात जेमतेम प्रतिक्विंटल 300 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले.

नगर जिह्यामध्ये कांदा उत्पादन मोठय़ा प्रमाणामध्ये होत असते. यंदा कांद्याला चांगल्या पद्धतीचा भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्र सरकारच्या धोरणाचा मोठा फटका शेतकरीवर्गाला बसला आहे. निर्यातबंदी उठविल्यानंतर कांद्याला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे होताना दिसत नाही. कांद्याला भाव वाढण्यापेक्षा भाव कमी होत चालले आहेत. त्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडला आहे. एकीकडे अवकाळी पावसाचा फटका त्यात कांदा पिकाचे व इतर शेतीमालाचे नुकसान झाले आहे. ही सर्व परिस्थिती पाहता कांद्याला भाव मिळेल, अशी आशा नाही. त्यामुळे कवडीमोल भावाने कांदा विकण्याची वेळ आली आहे.

वांबोरी उपबाजारात कांद्याच्या 4117 गोणी कांद्याची आवक झाली होती. त्यात एक नंबर कांद्याला 1500 ते 2000, दोन नंबर कांदा 1000 ते 1500 तर तीन नंबर कांदा 100 ते 1000 रुपये दराने विकला गेला. मोठय़ा व दर्जेदार कांद्याच्या 96 गोण्या 2000 ते 2 हजार 300 रुपये प्रतिक्विंटलने विकला गेला. तर 142 गोणी कांद्याला 1900 ते 2000चा भाव मिळाला. याव्यतिरिक्त सर्वाधिक 1171 गोणी कांद्याला 500 ते 1 हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. वाढलेली मजुरी, मशागत खर्च, खते, कीटकनाशकांचे दर पाहता सध्या मिळत असलेला कांद्याचा भाव शेतकऱयांचे आर्थिक गणित कोलमडून टाकणारा आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;