शेवगाव तालुक्यात पाण्याअभावी भाजीपाला काढून टाकण्याची वेळ

शेवगाव तालुक्यात पाण्याअभावी भाजीपाला काढून टाकण्याची वेळ

शेवगाव तालुक्यात गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाणीसाठे संपुष्टात येऊ लागले आहेत. विहिरी आणि कूपनलिका आटल्या आहेत. त्यामुळे शेतकऱयांनी भाजीपाल्याची लावलेली पिके जळून जाऊ लागली आहेत. त्यातच बाजारभाव नसल्यामुळे शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगावने परिसरातील शेतकऱ्यांवर भाजीपाला काढून टाकण्याची वेळ आली आहे.

शेवगाव तालुक्यातील देवटाकळी व परिसरातील पाझर तलाव व साठवण तलावातील पाणीसाठा खालावला आहे. नदी-नाले पूर्णपणे कोरडे पडले आहेत. शेत शिवारातील विहीर व विंधन विहिरींचे पाणी आटले आहे. जोहरापूर, खामगाव, हिंगणगाव, देवटाकळी, बक्तरपूर, मजलेशहर, भायगावसह परिसरातील शेतकऱयांनी आपल्या शेतात मोठय़ा प्रमाणात भाजीपाला लागवड केली आहे.

पाणीसाठा अत्यल्प असल्यामुळे शेतशिवारातील भाजीपाला जगवणे शेतकऱयांना जिकिरीचे झाले आहे. त्यात पिकविलेला टोमॅटो, कोथिंबीर, वांगी, भेंडी, मिरची शेतकरी बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जातात. मात्र, भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. भाजीपाला लागवडीपासून आतापर्यंत झालेला खर्चही आजपर्यंतच्या उत्पन्नात निघाला नाही. पुढील काळात तर लागणारा खर्च कमी व्हावा, या हेतूने शेतकरी शेती शिवारातून भाजीपाला काढून टाकण्याच्या मनःस्थितीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;