मिरजजवळ तीन वाहनांच्या अपघातात मुलगा ठार

मिरजजवळ तीन वाहनांच्या अपघातात मुलगा ठार

 रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील भोसे (ता. मिरज) या गावाजवळ ट्रक्टर, पॅगो रिक्षा आणि मिनी टेम्पो यांच्या विचित्र अपघातात एका चिमुकल्याचा मृत्यू झाला.

पॅगो मालवाहतूक रिक्षामध्ये पाच लहान मुले आणि पती-पत्नी हे ऊसतोड मजूर बसले होते. पॅगो रिक्षाला ओव्हरटेक करताना मागून आलेल्या मिनी टेम्पोने पॅगो रिक्षा आणि ट्रक्टरच्या ट्रॉलीला धडक दिली. पॅगो रिक्षात पाठीमागील बाजूस बसलेला अमित जगन्नाथ पवार हा 10 वर्षांचा मुलगा रस्त्यावर पडला. त्याच्या अंगावरून पिकअप मिनी टेम्पो गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी प्रचंड जमाव जमला. मुलाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त जमावाने मिनी टेम्पोच्या काचा फोडल्या.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. मिरज ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;