कोल्हापुरात वळीव बरसला; झाडांची पडझड
गेले काही दिवस ढगाळ वातावरण होऊनही पावसाने हुलकावणी दिल्याचे दिसून येत होते. मात्र, आज दुपारी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह आलेल्या वळवाच्या पावसाने कोल्हापूर शहर आणि परिसराला चांगलेच झोडपून काढले. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसाने कोल्हापूरकरांसह देवदर्शन आणि पर्यटनाला आलेल्यांचीही तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे आणि विजेचे खांबही पडले. जाहिरातीची हार्ंडग्जसुद्धा काही ठिकाणी पडल्याच्या घटना समोर आल्या असल्या, तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, जिह्यात अनेक ठिकाणी झालेल्या वादळी पावसाने कसबाबावडा-वडणगे रस्त्यावर विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला, तर वडणगे स्मशानभूमीचे छत कोसळले. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसाने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला.
चालत्या गाडीवर झाड कोसळले; दोघे जखमी
सोसाटय़ाचा वारा आणि मेघगर्जनेसह आज दुपारी कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली. याच वेळी दख्खनचा राजा श्री जोतिबाचे दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांच्या चालत्या चारचाकी मोटारीवर अचानक एक मोठे झाड कोसळले. यामध्ये दोघे जखमी झाले असून, जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List