बिल्डर पुत्राला पोलीस ठाण्यात बसायला खुर्ची, खायला पिझ्झा-बर्गर

बिल्डर पुत्राला पोलीस ठाण्यात बसायला खुर्ची, खायला पिझ्झा-बर्गर

मद्यपान करून बेदरकारपणे अलिशान कार चालवून तरुणीसह दोघांना चिरडणाऱया आरोपी बिल्डर पुत्राच्या दिमतीसाठी येरवडा पोलिसांनी चांगली काळजी घेतली. अल्पवयीन आरोपीला बसण्यासाठी पोलिसांनी चक्क खुर्ची दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात आलेल्या आरोपीच्या नातेवाईकांनी  त्याला पिझ्झा-बर्गरची मेजवाणी दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.

बिल्डर विशाल अगरवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांतने शनिवारी मध्यरात्री 3च्या सुमारास मित्रांसाबेत हॉटलेमध्ये मद्यपान पार्टी केल्यानंतर अलिशान पोर्शे कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरूणीचा 10 ते 15 फूट उंच उडून खाली पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला. तर, कारने फरफटत नेल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अल्पवयीन आरोपीला मारहाण करीत जाब विचारला. दरम्यान, मोटार चालविण्याचे प्रशिक्षण  आणि वाहन परवाना नसतानाही अल्पवयीनाने श्रीमंतीच्या जोरावर मस्तवालपणे वाहन चालवून तरुणीसह दोघांना चिरडल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे.

आरोपीचे नातेवाईक चार ते पाच अलिशान मोटारीतून पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी सोबत येताना 10 ते 15 पिझ्झा आणले होते. सर्व पिझ्झा अल्पवयीन आरोपीसह इतरांना देण्यात आले. मात्र, मीडियाची नजर पडताच, अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकांसह पोलिसांची भंबेरी उडाली. त्यांनी पिझ्झाचे बॉक्स लपविण्याचा प्रयत्न केला.

 

बिल्डर बाप, पब मालकासह मॅनेजरवर गुन्हा

मद्यपान करून बेदरकारपणे अलिशान कार चालवून अल्पवयीन आरोपीने तरूणीसह दोघांना चिरडल्याप्रकरणी  पुणे पोलिसांना संबंधिताच्या बिल्डर वडिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबत त्याला मद्य पुरविणारा पब मालकासह मॅनेजरविरूद्धही येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  प्रल्हाद भुतडा (रा. येरवडा) सचिन काटकर, संदीप सांगळे जयेश बोनकर आणि विशाल अगरवाल (रा. वडगाव शेरी ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;