मोठा अनर्थ टळला ! पुणे विमानतळावर एअर इंडियाचे विमान ‘पुश बॅग टग’ला धडकले
पुणे विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे विमानतळावरुन दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या पुश बॅग टग या वाहनाची एअर इंडियाच्या विमानाला धडक बसल्याने मोठा अपघात झाला. यावेळी विमानात 180 प्रवासी होते. अचानक काहीतरी धडकल्याचा आवाज आल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. यामध्ये विमानाचे नुकसान झाले असून प्रवाशी सुखरुप आहेत.
एअर इंडियाचे हे विमान पुण्याहून दिल्लीकडे गुरुवारी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी जाणार होते. त्यावेळी विमानात 180 प्रवासी होते. त्याचवेळी विमान टॅक्सी ट्रॅकवरून धावपट्टीच्या दिशेने जाण्याआधीच त्याला ‘पुश बॅक टग’ची जोरदार धडक बसली आणि मोठा आवाज आला. प्रवाशांना काहीतरी जोरदार धडकल्याचा आवाज आल्याने सर्व प्रवाशी प्रचंड घाबरले. यात विमानाच्या पुढच्या टायरचे आणि पंख्याच्या पत्र्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्या विमानाचे उड्डाण रद्द करावे लागले.
विमानच्या अपघातामध्ये विमानाचा पंखा, टायरचे नुकसान झाले आहे. मात्र विमानाच्या पंख्यामध्ये इंधन असते. त्याने पेट घेतला असता तर मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने हा अनर्थ टळला.
An Air India flight bound for Delhi experienced a collision with a tug tractor while taxiing towards the runway at Pune Airport yesterday, 16th May. The incident occurred when around 180 passengers were on-board.
“The aircraft, carrying around 180 passengers, suffered damage to… pic.twitter.com/MkxCRDlI2n
— ANI (@ANI) May 17, 2024
पुश बॅक टगवरचे ऑपरेटरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे पुश बॅक टग सरळ एअर इंडियाच्या विमानाला धडकून मोठा आवाज झाला. त्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले. विमानाचा पायलट खाली उतरल्यावर त्याने पाहणी केली. त्यानंतर प्रकार लक्षात आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List