पंढरपुरातील अनधिकृत होर्डिंग्ज उतरवले; मुंबई घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेची धडक मोहीम

पंढरपुरातील अनधिकृत होर्डिंग्ज उतरवले; मुंबई घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेची धडक मोहीम

पंढरपूर शहर व उपनगरीय भागातील अनधिकृत होर्डिंग्जवर पंढरपूर नगरपालिकेने धडक मोहीम राबवित कारवाई सुरू केली आहे. आज शहरातील पाच मोठे अनधिकृत होर्डिंग्ज जेसीबीच्या साहाय्याने उतरविण्यात आले, तर 55 होर्डिंग्जवाल्यांना होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट त्वरित करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचा इशारा मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी दिला आहे.

मुंबई घाटकोपर येथे झालेल्या होर्डिंग्जच्या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये ज्या ज्या शहरांमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज असतील, त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार पंढरपूर नगरपालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, उपमुख्याधिकारी सुनील वाळुंजकर, नगर अभियंता नेताजी पवार, नगर रचना सहायक सुहास झिंगे, सोमेश धट, चिदानंद सर्वगोड, नवनाथ पवार यांच्यासह अतिक्रमण विभागाच्या टीमने शहरातील सर्व होर्डिंग्जचा सर्व्हे करून 5 अनधिकृत होर्डिंग्ज रात्री उशिरापर्यंत काढून टाकले.

तसेच रेल्वे हद्दीमध्ये व शहरांमध्ये उपेंद्र पब्लिसिटी आणि बाबा पेस्टिंग यांनी 55 होर्डिंग्ज लावले आहेत. त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. लावलेल्या होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट त्वरित करून सात दिवसांत अहवाल सादर करावा. तसे न केल्यास व काही दुर्घटना घडल्यास ते जबाबदार राहतील, अशा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत.

मुंबई घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या आदेशानंतर पंढरपूर शहरातील अनधिकृत होर्डिग्ज हटविण्यासाठी धडक मोहीम सुरू केली आहे. संबंधित होर्डिंग्ज, एजन्सी यांनी त्वरित माहिती द्यावी किंवा होर्डिंग्ज काढून घ्यावेत; अन्यथा त्यांच्यावर कारवाई करणार आहोत.

– डॉ. प्रशांत जाधव, मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपालिका

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;