नासक्या कांद्यामुळे शेतकऱयांना फटका; सोलापूर कृषी बाजार समितीत कांद्याची आवक कमी

नासक्या कांद्यामुळे शेतकऱयांना फटका; सोलापूर कृषी बाजार समितीत कांद्याची आवक कमी

सोलापूर कृषी उत्पन बाजार समितीत कांद्याचे दर घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्यातील एका शेतकऱयाला 24 पोते कांदा विक्री करून फक्त 557 रुपये मिळाले होते. सोलापूर मार्केट यार्डात कांद्याची आवकदेखील कमी झाली आहे. नासलेला कांदा विक्रीसाठी आल्याने कांद्याला भाव मिळत नसल्याची माहिती येथील व्यापाऱयांनी दिली.

सोलापूर कृषी उत्पन बाजार समितीमधील व्यापारी अजहर बागवान यांनी सांगितले की, उत्तम दर्जाच्या कांद्याला मागणी आहे, मात्र शेतकरी नासका कांदा विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे शेतकऱयांना योग्य भाव मिळत नाही. उत्तम दर्जाच्या कांद्याला आजही 20 ते 25 रुपये प्रतिकिलो भाव मिळतो. मात्र, उसात लागवड केलेला कांदा आणला जात आहे.

उसात लागवड केलेला कांदा लवकर खराब होतो. तसंच सोलापूरच्या वाढत्या तापमानामुळे कांद्याच्या पाकिटात पाणी सुटत आहे आणि दुर्गंधी येत आहे. नासलेला कांदा आणि दुर्गंधीयुक्त कांद्याला भाव मिळत नाही. सोलापूर मार्केट यार्डात येणारे परराज्यातील अन्य व्यापारीदेखील हा कांदा खरेदी करत नाहीत. नासलेला कांदा परराज्यात पाठवला तर तेथील व्यापारी नासक्या कांद्याचे पैसे देत नाहीत, अशी खंत सोलापूर मार्केट यार्डातील व्यापाऱयांनी क्यक्त केली.

मार्केट यार्डात दुर्गंधी

मार्केट यार्डात नासलेल्या कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱयांनी यार्डातच कांदा फेकला आहे. त्यामुळे बाजार समितीत दुर्गंधी पसरली आहे. वाढत्या तापमानाचा फटका शेतकऱयांच्या कांद्याला बसत आहे. सोलापुरात दोन महिन्यांपासून 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्याने कांद्याला पाणी सुटत आहे. त्यामुळे हा कांदा कुणीही खरेदी करीत नाही. त्यामुळे शेतकरी व्यापाऱयाच्या लिलावाकर खापर फोडत आहे.

चांगल्या कांद्याला योग्य भाव देऊ

चांगला आणि उत्तम दर्जाचा कांदा आणा आम्ही योग्य भाव देऊ. उसात लागवड केलेला कांदा लवकर खराब होत आहे. सोलापूर मार्केट यार्डातील कांदा व्यापारी शेतकऱयांकडून खरेदी केलेला कांदा आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, ओडिशा या राज्यांत निर्यात करतात. या राज्यात कांदा पाठवताना जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. मात्र,  पंधरा दिवसांत कांदा खराब होत आहे आणि तेथील व्यापारी कांद्याची रोकडदेखील देत नाही, त्यामुळे खराब कांद्याला सोलापूर मार्केट यार्डात भाव मिळत नसल्याचे व्यापारी अजहर बागवान यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;