अवकाळी पावसाने सांगली, नगरला झोडपले

अवकाळी पावसाने सांगली, नगरला झोडपले

सांगली शहरासह जिह्यातील काही भागात आज सायंकाळच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. सुमारे दीड तास धुव्वांधार पावसाची बॅटिंग सुरू होती. मिरज, तासगाव, आटपाडी, पलूस, वाळवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱयासह जोरदार पाऊस झाला. पावसाची संततधार असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार वाऱयामुळे महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला होता.

हवामान खात्याने चार दिवसांपूर्वीच आठवडाभर जिह्यात पावसाचा मुक्काम असल्याचा अंदाज वर्तविला होता. सकाळपासून उकाडा आणि सायंकाळी पाऊस असे दृश्य पाहायला मिळाले. जिह्यातील वाळवा, पलूस, मिरज, तासगाव आणि आटपाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱयासह जोरदार पाऊस झाला. वाळवा आणि मिरज तालुक्यात काही ठिकाणी शाळूच्या मळणीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. जोराचा वारा वाहत असल्याने संभाव्य धोका आणि नुकसान टाळण्यासाठी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

शहर परिसरात सायंकाळी पाच वाजल्यापासून पाऊस पडण्यास प्रारंभ झाला. मागील आठवडय़ात पाऊस पडल्याने शहराच्या मान्सूनपूर्व तयारीचा बोजवारा उडाल्याचे पाहावयास मिळाले होते. त्यावेळी पडलेल्या पावसाचे पाणी अद्यापही गुंठेवारी भागात साचून राहिले आहे. त्यात पुन्हा झालेल्या पावसामुळे पुन्हा पाणी साचले. सांगली-मिरज रस्त्यावरून जाणाऱया बहुतेकांनी पावसाचा मारा चुकविण्यासाठी झाडांच्या खाली थांबणे पसंत केले. पावसामुळे शहरातील राम मंदिर, स्टान चौक, बसस्थानक परिसर, विश्रामबाग चौक, आमराई रस्ता आदी भागांत पाणी साचल्याने नागरिकांना वाहन चालविताना काळजी घ्यावी लागत होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;