नगर जिह्यात पाण्याचा ठणठणाट! 312 टँकरने सहा लाख नागरिकांना पाणीपुरवठा

नगर जिह्यात पाण्याचा ठणठणाट! 312 टँकरने सहा लाख नागरिकांना पाणीपुरवठा

नगर विभागातील पाणीटंचाईची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत आहे. जिह्यात पाण्याचा ठणठणाट होत असून, अनेक गावे पाणीटंचाईच्या विळख्यात सापडली आहेत. प्रशासनातर्फे 312 टँकरने 291 गावे, 1544 वाडी-वस्त्यांवरील 5 लाख 70 हजार लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

नगर जिह्यात नगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघांत निवडणुका पार पडल्या. यामध्ये प्रशासन, नेते मंडळी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्तेही अडकले होते. त्यामुळे अनेकांना पाणीटंचाईकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. परंतु, आता ही निवडणूक संपल्याने तहानलेल्या लोकांना पाणीपुरवठा करण्यावर प्रशासनाला भर द्यावा लागणार आहे. सध्या जिह्यात 312 टँकरने 291 गावे व 1544 वाडी-वस्त्यांवरील 5 लाख 70 हजार लोकांना पाणीपुरवठा सुरू आहे. ग्रामीण भागात पाण्याचे उद्भव कोरडे पडू लागल्याने दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होत आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीत व्यस्त होते. परंतु, आता निवडणुका संपल्याने पाणीटंचाईला प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यातच अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र सध्या आहे. जिह्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने जानेवारी महिन्यापासून जिह्यात टँकरच्या मागणीला सुरुवात झाली. अर्थात टँकरची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास फेब्रुवारी महिना उजाडला. त्यानंतर खऱया अर्थाने टँकरमध्ये वाढ होऊ लागली. आजअखेर जिह्यात 312 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

सर्वाधिक पाणीटंचाईची तीव्रता पाथर्डी तालुक्यात असून, निम्म्याहून अधिक तालुक्याला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या या तालुक्यात 83 गावे, 429 वाडय़ांवरील तब्बल 1 लाख 66 हजार 992 लोकांना 99 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय जिह्यातील 11 तालुक्यांमध्ये टँकर सुरू झाले आहेत. तसाच पाणीपुरवठा आता शहरी भागात म्हणजे नगरपालिका हद्दीमध्येदेखील करावा लागत आहे. सध्या पाथर्डी, कर्जत, पारनेर, श्रीगोंदा व शेवगाव या पाच नगरपालिका हद्दीत 27 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;