जीएसटी आयुक्तांनी जमीन बळकावली; जिल्हाधिकाऱयांकडून चौकशीचे आदेश
गुजरातमधील ‘जीएसटी’च्या मुख्य आयुक्तांनी सातारा जिह्यातील कांदाटी खोऱयात जमीन बळकाविल्याच्या प्रकरणाला प्रसारमाध्यमांनी वाचा फोडल्यानंतर प्रशासन ‘ऍक्टिव्ह मोड’वर आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांनी प्रांतांना दिल्या आहेत.
मूळचे नंदुरबारचे रहिवासी असलेले आणि सध्या अहमदाबाद (गुजरात) येथे जीएसटी मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी यांनी सातारा जिह्यातील कांदाटीतील 620 एकर जमीन बळकाविल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी जबाबदार घटकांवर फौजदारी कारवाईचे आदेश पारित करावेत; अन्यथा 10 जूनपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सातारा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिला होता.
प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर जिल्हा प्रशासन ‘ऍक्टिव्ह मोड’वर आले आहे. या प्रकरणाची दखल घेत सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाईचे प्रांत राजेंद्र जाधव यांना याप्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना आजच दिल्या आहेत. त्यानुसार जाधव यांनीही महाबळेश्वरच्या तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात काही चुकीचे झाल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List